आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Gift Of Rs.1000 To The Family In The Village Where The Girl Was Born In Amreli

चार मुलींच्या वडिलांचा संकल्प:अमरेलीमध्‍ये गावातील ज्या घरात मुलगी जन्मली त्या कुटुंबाला हजार रुपये भेट

अमरेली (गुजरात)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या एका गावात चार मुलींच्या वडिलांनी मुलींच्या हितासाठी प्रेरक निर्णय घेतला आहे. याअंतर्गत गावातील ज्या घरात मुलीचा जन्म होईल त्या घरच्या कुटुंबाला १० हजार रुपये भेट देतील. अमरेली जिल्ह्याच्या ईश्वरिया गावातील मनसुखभाई करसनभाई रूपाला यांनी या घोषणेनंतर पाच मुलींच्या जन्मावेळी ५० हजार रुपये भेटही दिले आहेत. रूपाला सांगतात, महिला कोणत्याही जातीची-धर्माची असो, हा उपक्रम घरातील, गावातील सुनाच नाहीत तर गावाकडे आपल्या माहेरी पहिल्यांदा बाळंतपणाला आलेल्या मातांसाठीही लागू आहे. नुकत्याच माहेरी आलेल्या एका मातेने जुळ्या मुलींना जन्म दिला. रूपाला यांनी त्यांना २० हजार रुपये भेट म्हणून दिले.

सुमारे २ हजार लोकसंख्येचे हे गाव अमरेलीचा (सौराष्ट्र) भाग आहे. अमरेलीमध्ये मुलगा-मुलगीचे प्रमाण १०००:९३३ इतके आहे. कडवा पाटीदार समाजात हे प्रमाण आणखी चिंताजनक आहे. यामुळे विवाहासोबतच सामाजिक पातळीवर अनेक समस्या येतात. रूपाला ही रक्कम नवजात बाळाच्या नावे करतात. १८ वर्षांची झाल्यानंतर मुलीला ही रक्कम व्याजासह मिळेल.

बातम्या आणखी आहेत...