आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Glacier Has Burst । Near Uttarakhand's Joshimath । India China Border Army Rescue Operation Continues In Joshimath After The Glacier Breaks, So Far 291 People Have Been Saved; Meteorological Department Warns Of Thunderstorms With Heavy Rain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळली:दोन जणांचे मृतदेह सापडले, बचावकार्य करणाऱ्या सैन्याने 291 जणांना वाचवले; हवामान विभागाने आज दिला पावसाचा इशारा

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्यावेळी हिमकडा कोसळली, मजूर करत होते काम

उत्तराखंडमध्ये चमोली जनपदच्या जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर सैन्याचे बचावकार्य सुरू आहे. ग्लेशियर तुटून मलारी-सुमना रस्त्यावर पडले होते. या रस्त्यावर कंस्ट्रक्शनचे काम सुरू होते. सैन्यानुसार, आतापर्यंत दोन मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि 291 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सैन्याच्या सेंट्रल कमांडनुसार, हे लोक जोशीमठच्या सुमना भागात असलेल्या बॉर्डर रोड ऑर्गेनायजेशन (BRO) च्या कँपमध्ये होते. खराब वातावरणामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. आता सकाळ होताच पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

याच दरम्यान, हवामान विभागाने इशारा दिला आहे की, पुढील 28 तासांमध्ये चमोलीमध्ये मुसळधार पावसासह वादळ येऊ शकते. या दरम्यान येथे किमान तापमान 6 डिग्री आणि कमाल 14 अंश सेल्सिअस राहील. हवामान खात्याने 26 एप्रिलपासून आकाश साफ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ज्यावेळी हिमकडा कोसळली, मजूर करत होते काम
BRO चे कमांडर कर्नल मनीष कपिल यांनी या विषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, रस्त्ये निर्मितीचे काम सुरू होते, सुदैवाने रस्त्याचे काम करत असलेल्या रुग्णांना नुकसान पोहोचलेले नाही. हिमकडा कोसळण्यामागे हिमवर्षाव हे कारण मानले जात आहे. या अपघातामुळे जोशीमठ-मलारी हायवेही बर्फाने झाकला आहे.

NTPC सह सर्वच कंस्ट्रक्शनचे काम रोखण्यात आले
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी म्हटले आहे की, नीती घाटाच्या सुमनामध्ये हिमकडा कोसळल्याची सूचना मिळाली आहे. या संबंधात मी अलर्ट जारी केला आहे. मी सतत जिल्हा प्रशासन आणि बीआरओच्या संपर्कात आहे. जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची पूर्ण माहिती काढण्याचे निर्देश दिले आहेत. एनटीपीसी आणि इतर परियोजनांमध्ये रात्रीच्या वेळी काम रोखण्याचे आदेश दिले आहे, जेणेकरुन कोणतीही अप्रिय घटना घडू नये.

फेब्रुवारीमध्ये आला आहे जल प्रलय
यापूर्वी उत्तराखंडमध्ये 7 फेब्रुवारी 2021 च्या सकाळी 10 वाजता चमोली जिल्ह्याच्या तपोवनमध्ये हिमकडा कोसळून ऋषिगंगा नदीमध्ये कोसळले होते. यानंतर 50 पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह मिळाले होते तर 150 पेक्षा जास्त लोकांचा काहीच पत्ता लागला नाही. प्रशासनाने काही दिवस शोधमोहिम सुरू ठेवली, मात्र नंतर सर्व बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यात आले. नदीमध्ये हिमकडा कोसळल्यामुळे धौलीगंगावर बांधला जात असणारा एक बांध वाहून गेला होता. तपोवनमध्ये एक प्रायव्हेट कंपनीच्या ऋषिगंगा हायड्रो पावर प्रोजेक्ट आणि सरकारी कंपनी NTPC च्या प्रोजेक्टवर काम सुरू होते. दुर्घटनेत हे एक मोठो नुकसान झाले होते.

बातम्या आणखी आहेत...