आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगल सर्व्हिस डाउन:गुगलप्रेमी हँग, जीमेलचे ई-मेल लटकले...ड्राइव्हनेही सोडली साथ; दुपारनंतर काही प्रमाणात सेवा झाली सुरू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज जगभरात अनेकांची सकाळ गुगलने सुरू होते. काही शोधायचे, कुठे जायचे, कसे जायचे... या सर्व प्रश्नांची उत्तरे हल्ली गुगल सेकंदात देते. मात्र, गुरुवारी या गुगललाच काही वेळ फेरा आला आणि जगाच्या अनेक भागांत गुगलप्रेमी हँग झाले. कोट्यवधी लाेकांना गुगल सेवा घेण्यास अनेक अडचणी आल्या. युजर्संना जीमेलवरून ई-मेल करण्यास व फाइल अॅटॅचमेंट करण्यात अडचणी येत होत्या. जीमेलसंबंधातील अनेक सेवांमध्येही व्यत्यय येत होता. गुगल ड्राइव्हसंबंधीही लोकांनी साेशल मीडियावर तक्रारी केल्या. काही युजर्सनी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी केल्या. मात्र सर्वाधिक अडचण जीमेल युजर्सची झाली होती.

गुगलची पळापळ... | गुगलने सर्व जीमेल युजर्संना मेल पाठवून जीमेलमधील दोष शोधत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुपारी ३.१० मिनिटांनी गुगलने सर्वांना मेल पाठवून काही युजरच्या सेवा सुरू झाल्याचे सांगितले.

या सेवेत आल्या अडचणी | जीमेल, गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक्स, गुगल ग्रुप, गुगल चॅट, गुगल मीट, जी सूट, गुगल व्हॉइस, यूट्यूब इत्यादी.

जगभरात ४०३ कोटी ई-मेल युजर्सपैकी १८० कोटी जीमेलचे युजर्स, रोज पाठवले जातात ३०,६४० कोटी मेल ‘सिएस्टा’ने अलीकडेच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जगभरात जवळपास ४०३ कोटी लोक ई-मेल वापरतात. त्यातील १८० कोटी म्हणजे सुमारे ४३% जीमेल युजर आहेत, तर जगभरात रोज एकूण सुमारे ३०,६४० कोटी ई-मेल पाठवले किंवा स्वीकारले जातात.

दुपारी १२ वाजता वाजले बारा!
सोशल मीडियावर “गुगल इज डाऊन’ असा ट्रेंड सुरू होता. दुपारी सुमारे १२ वाजता ही समस्या खूप गंभीर झाली होती. दोन महिन्यांत अशी अडचण येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अनेक तास जीमेल सेवा बंद होती. यानंतर गुगलने यास दुजोरा देत निवेदन देऊन दुपारी १.३० वाजता ही समस्या दूर करण्यात येईल असे स्पष्ट केले. जीमेलबद्दलच्या सूचनेमध्ये गुगल सूटबद्दल मात्र काहीही सांगितले नाही.

अटॅचमेंट केल्यावर फाइल जम्प होत आहे
अटॅचमेंट केल्यावर फाइल जम्प होत आहे
बातम्या आणखी आहेत...