आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Good Sign That The Taste Buds Are Going Away In The Carnivores, Reducing The Risk Of Serious Illness; The Doctor Claimed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:काेराेनाबाधितांमधील स्वाद-सुगंध जाणे चांगले संकेत, गंभीर आजाराचा धाेका कमी; डॉक्टरांनी केला दावा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय डाॅक्टरांच्या मते, सुमारे 40 टक्के बाधित तात्पुरत्या स्वरूपात गमावतात स्वाद-सुगंधाची संवेदना

काेराेना संसर्गाच्या प्रमुख लक्षणांमध्ये स्वाद व सुगंधाची संवेदना जाण्याचा समावेश हाेताे. त्यामुळे अनेक बाधित घाबरून जातात. परंतु ही लक्षणे एका अर्थाने चांगली आहेत. कारण त्यावरून व्यक्तीला गंभीर स्वरूपाचा आजार हाेण्याची शक्यता कमी हाेते, असा दावा भारतीय डाॅक्टरांच्या एका टीमने केला आहे. अशा स्वरूपाचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णांवर श्वसनासंबंधीचा हल्ला हाेत नाही. सामान्यपणे अशा स्वरूपाचा अॅटॅक विषाणूच्या १४ दिवसांच्या सायकलच्या दुसऱ्या आठवड्यात येताे.

जगभरात काेराेना महामारीचा १० व्या महिन्यात प्रवेश झाला आहे. यादरम्यान जवळपास सर्वच देशांतील रुग्णांमध्ये माेठ्या प्रमाणात स्वाद व सुगंधाची संवेदना गायब झाल्याची तक्रार आढळून येते. सामान्यपणे तीन ते चार आठवड्यांत ही समस्या ठीक हाेते. नाेएडा येथील यथार्थ रुग्णालयाचे चेस्ट फिजिशियन व पल्मनाेलाॅजिस्ट डाॅ. अरुण लखनपाल व त्यांच्या टीमच्या म्हणण्यानुसार काेराेनामुळे आयसीयूमध्ये भरती हाेणाऱ्या बहुतांश रुग्णांनी स्वाद व सुगंध गमावल्याचे सांगितले नाही.

डाॅ. लखनपाल म्हणाले, अशा प्रकारचा अनुभव असलेल्यांना जास्त खारट व गाेड स्वाद जाणवू लागताे. त्यांना पाणी गाेड असल्यासारखे वाटू शकते. परफ्युमचा वापर केल्यावर अशा रुग्णांना त्यामधील अल्काेहाेलचा वास जास्त येऊ शकताे. त्याशिवाय इतर काेणताही वास त्यांना येत नाही. जवळपास ४० टक्के रुग्णांमध्ये स्वाद व सुगंध जात असल्याचे आढळून आले आहे. उपचाराच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानले पाहिजेत.

गुडगाव येथील मेदांता रुग्णालयाचे वरिष्ठ संचालक डाॅ. सुशीला कटारियादेखील डाॅ. लखनपाल यांच्याशी सहमत आहेत. त्या म्हणाल्या, स्वाद व सुगंध गमावणाऱ्या रुग्णांची स्थिती फारशी गंभीर नसल्याचे माझेही निरीक्षण आहे. त्यांना आॅक्सिजन सपाेर्टची जास्त गरज भासत नाही आणि रुग्णालयात दाखलही व्हावे लागत नाही.या आधी विविध देशांत झालेल्या संशोधनात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर स्वाद व सुगंधाची जाणीव मावळत असल्याचे म्हटले होते.

काेणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष नकाे, तपासणी करा

काेराेना रुग्णांमधील स्वाद व सुगंध जाण्याच्या कारणांचा अद्याप पूर्ण अभ्यास झालेला नाही. परंतु विषाणू संवेदनेशी संबंधित नर्व्हला प्रभावित करताे. त्यामुळे हे घडत असावे, असे मानले जाते. खरे तर स्वाद व सुगंधाची संवेदना जाणे हे केवळ काेराेनापुरते मर्यादित नाही. सर्दी, सायनसायटिसपासून ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर प्रकरणांतही आढळते. म्हणून काेणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, तत्काळ सूचनांचे पालन करून तपासणी करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. नियमितपणे तापमान व ऑक्सिजन पातळी माेजली पाहिजे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser