आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाकू गुड्डाच्या 'हिप्स'मध्ये दीड वर्षांपासून गोळी:दीड वर्षांपूर्वी लागली होती, ऑपरेशनसाठी डॉक्टरला घेऊन गेला होता जंगलात

ग्वाल्हेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंबळच्या खोल डोंगर-दऱ्यांत बंदुकीच्या जोरावर दहशत निर्माण करणारा कुख्यात इनामी डाकू गुड्डा गुर्जर आता पोलिसांच्या तावडीत आहे. ग्वाल्हेरपासून 40 किमी अंतरावर झालेल्या एका संक्षिप्त चकमकीत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्या पायाला गोळी लागली आहे.

गुड्डा गुर्जरला पोलिसांची गोळी लागल्याची ही काही पहिलीच घटना नाही. दीड वर्षांपूर्वी ग्वाल्हेरच्या बानमोर त्याची पोलिसांसोबत चकमक झाली होती. तेव्हा पळून जाताना त्याच्या हिप्समध्ये गोळी लागली होती. तेव्हा गोळी काढण्यासाठी मुरैनाच्या एका बोगस डॉक्टरला त्याने जंगलात नेले होते.

पण जंगलात ऑपरेशन शक्य नसल्यामुळे त्याची गोळी काढता आली नव्हती. डॉक्टरने त्याची केवळ मलमपट्टी केली होती. ती गोळी आजपर्यंत गुड्डाच्या हिप्स अर्थात नितंबामध्ये अडकून पडली आहे. हा खुलासा पोलिस चौकशीत झाला. पोलिस डॉक्टरांचा सल्ला घेऊन हिप्सचा एक्स-रे काढण्याच्या तयारीत आहेत.

गुड्डा 23 वर्षांपासून चंबळमध्ये सक्रिय आहे. यामुळे अंचलची प्रतिमा मलिन होत होती. सीएम शिवराज यांनी गुड्डा टोळीचा सफाया करण्याचे निर्देश दिले होते.
गुड्डा 23 वर्षांपासून चंबळमध्ये सक्रिय आहे. यामुळे अंचलची प्रतिमा मलिन होत होती. सीएम शिवराज यांनी गुड्डा टोळीचा सफाया करण्याचे निर्देश दिले होते.

चकमकस्थळी 22 गोळ्यांच्या पुंगळ्या

ग्वाल्हेर क्राइम ब्रँचने एएसपी राजेश दंडौतिया यांनी सांगितले की, बुधवारी रात्री घाटीगावच्या भंवरपुरा-डाडाखिरक बसोटाच्या जंगलात झालेल्या चकमकीत 60 हजारचे बक्षीस असणाऱ्या गुड्डा गुर्जरला अटक करण्यात आली. पळताना डाकू गुड्डाच्या पायात गोळी लागली. त्यानंतरही त्याने लंगडत पोलिसांवर गोळीबार केला. काही दूर पळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून रायफल व काडतूस जप्त करण्यात आलेत. चौकशीत त्याच्या नितंबात दीड वर्षांपूर्वी एक गोळी लागल्याचे स्पष्ट झाले.

100 हून जास्त फायर झाल्याचा दावा

दोन्ही बाजूने सव्वा 2 तास गोळीबार झाला. त्यात 100 हून अधिक फायर झाल्याचा दावा करण्यात आला. पण गुरुवारी गोळ्यांची जुळवाजुळव केल्यानंतर स्थिती स्पष्ट झाली. ऑपरेशनमध्ये 7 पोलिस अधिकारी व जवान सहभागी होते. यात डीएसपी क्राइम रत्नेश तोमर, टीआय क्राइम दामोदर गुप्ता व क्राइम ब्रँचचे मनोज परमार, नरवीर, भगवती, रामवीर, विकासने एकूण 37 गोळ्या झाडल्या होत्या. गुरुवारी घटनास्थळावरून 22 पुंगळ्याही मिळाल्या. डाकूनेही 20 ते 22 गोळ्या झाडल्याची बाब उजेडात आली आहे.

पोलिस कोठडीत प्रीति गुर्जर. पोलिसांच्या मते प्रीति आपला काका गुड्डा गुर्जरला अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तुंसह काडतुस देण्यास जात होती. रात्रीच्यावेळी तिला अटक करण्यात आली. ती एकटीच होती.
पोलिस कोठडीत प्रीति गुर्जर. पोलिसांच्या मते प्रीति आपला काका गुड्डा गुर्जरला अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तुंसह काडतुस देण्यास जात होती. रात्रीच्यावेळी तिला अटक करण्यात आली. ती एकटीच होती.

गुड्डाचा सहकारी करुआ, अशोकचा शोध

पोलिसांनी डाकू गुड्डाच्या अटकेनंतर त्याचे फरार सहकारी करुआ, अशोक यादव यांचा शोध सुरू केला आहे. ग्वाल्हेर पोलिस भंवरपुरापासून तिघरापर्यंत जंगल तपासून पाहत आहेत. याशिवाय मुरैना पोलिसही या दोघांचा शोध घेत आहेत.

डाकूची वहिणी गीता गायब

ग्वाल्हेर चकमकीनंतर मुरैना पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता डाकूची वहिणी गीता आपल्या दोन्ही मुलींसह बेपत्ता झाली आहे. वहिणीचे गँगला सहकार्य होते की नाही हे तपासून पाहिले जात आहे.

आज कोर्टात सादर करणार

पोलिस गुड्डाची चौकशी करत आहेत. त्याच्याकडून काही महत्वाची माहितीही मिळाली आहे. त्याच्याजवळ जाण्याची कुणालाही परवानगी नाही. पोलिस त्याला लवकरच कोर्टात हजर करून कोठडीची मागणी करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...