आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A. If You Watch Foreign Movies In Korea, Permission Is Also Required For Hairstyles | Marathi News

किमची हुकूमशाही:उ. कोरियात परदेशी चित्रपट पाहिल्यास कैद, हेअरस्टाइलसाठीही परवानगी हवी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची जनतेवर पोलादी पकड आहे. म्हणूनच उ. काेरियात परदेशी चित्रपट पाहणे किंवा परदेशात फोन करणे देशद्राेहाच्या श्रेणीत येते. तसे केल्यास तुरुंगवास भोगावा लागतो. कोणत्याही गुन्ह्यासाठी केवळ आरोपीलाच नव्हे तर त्याचे आई-वडील, मुले एवढेच नव्हे तर आजी-आजोबांनाही कैद होते. त्याला तीन पिढ्यांची शिक्षा असे संबोधले जाते. नागरिकांना पसंतीची हेअरस्टाइलही ठेवता येत नाही. त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. सरकारने पुरुषांसाठी १० तर महिलांसाठी २८ केशरचना निश्चित केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त केशरचना केल्यास ही कृती शिक्षेस पात्र ठरते. तरुणांसाठी लष्करात सेवा देणे अनिवार्य आहे.

बातम्या आणखी आहेत...