आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रयागराजच्या जगप्रसिद्ध माघ मेळ्यात कोरोनाच्या भीतीला श्रद्धा-भक्तीने मात दिली. गुरुवारी माघ मेळ्यातील सर्वात मोठ्या पवित्र स्नान पर्वात सहभागी होण्यासाठी भाविक बुधवारपासूनच येत होते. रात्री १२ पासून अमावास्येची तिथी प्रारंभ होताच पावन त्रिवेणीत डुबकी घेण्यास सुरुवात झाली. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सुमारे ३५ लाख भाविकांनी पवित्र स्नान केले. कोरोना काळात बहुदा पहिल्यांदाच देश-विदेशातील एवढे लोक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. गुरुवारी भाविकांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी झाली. मेळा व्यवस्थापनसंबंधी अधिकारी विवेक चतुर्वेदी म्हणाले, स्नानासाठी ८ किमी अंतरात ८ घाट आहेत. ५ हजारांहून जास्त जवान तैनात आहेत. सीसीटीव्ही व ड्रोनच्या साहाय्याने निगराणी केली जात आहे.
राजकारणात श्रद्धेची डुबकी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी त्रिवेणीत पवित्र स्नान केले आणि बोटही वल्हवली. त्यानंतर त्या मनकामेश्वर मंदिरात दाखल झाल्या. येथे त्यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्या वडिलोपार्जित निवासस्थान आनंद भवनला भेट देऊन आल्या. आनंद भवनात त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीस अभिवादन केले. अनाथालयात मुलांसोबत काही वेळ व्यतीत केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.