आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 जखमी:म्हैसूरच्या कनक नगरमध्ये शिरलेला बिबट्या, वन विभागाने केला जेरबंद

म्हैसूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये शुक्रवारी बिबट्याचा धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

नागरी वस्तीत शिरला बिबट्या

याविषयी सविस्तर वृत्त असे की, कर्नाटकच्या म्हैसूरमधील कनक नगरमधील रहिवासी भागात शुक्रवारी एक बिबट्या शिरला. नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला पाहून लोकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. यावेळी बिबट्याला पाहून अनेकांनी पळ काढला तसेच गोंधळ घातला. या गोंधळामुळे बिबट्याही बिथरला आणि तो मोकळी जागा पाहून पळायला लागला. यावेळी बिथरलेल्या बिबट्याच्या तडाख्यात सापडलेले दोघे जण जखमी झाले.

बिबट्याच्या धुमाकुळाचे व्हिडिओ व्हायरल

बिबट्याच्या मुक्त संचाराचे आणि हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यापैकी एका व्हिडिओत बिबट्या एका दुचाकीस्वारावर तसेच नंतर त्याला हाकलणाऱ्या एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसतो. हे दोघेही बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. मात्र नागरिकांच्या गोंधळाने हा बिबट्या बिथरून इकडे-तिकडे धावताना यात दिसतो.

वन विभागाने केले जेरबंद

बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला जेरबंद केले. खूप मेहनतीने वन विभागाने बिबट्याला बेशुद्ध करत त्याला पकडले. बिबट्या पकडला गेल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र बिबट्यांच्या नागरी वस्तीत शिरण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...