आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बिहार:वडिलांचा अपमान झाला, साेबत कसा जाणार? चिराग पासवान यांनी नड्डांना लिहिलेले पत्र झाले जाहीर

पाटणा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रातून पंतप्रधान माेदी व भाजपचे काैतुक

बिहारमध्ये निवडणूक जाहीर हाेण्याच्या एक दिवस आधी लाेजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले हाेते. हे पत्र आता जाहीर झाले आहे. या पत्रातून चिराग यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लाेजपाच्या नाराजीचा उल्लेख केलेला िदसताे. त्यांनी पंतप्रधान माेदी व भाजपचे काैतुक केले आहे.राज्यसभा निवडणुकीच्या काळात पक्षाचे संस्थापक व नेते रामविलास पासवान यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वागणुकीला चिराग यांनी आक्षेप घेतला आहे. चिराग म्हणाले, नितीशकुमार यांनी रामविलास पासवान यांचा अपमान केला आहे.

लाेकसभा निवडणुकीत नितीश यांनी लाेजपाला एक राज्यसभेची जागा देऊ केली हाेती, परंतु पाठिंबा देण्यास मनाई केली हाेती. आमच्या नेत्याविषयी त्यांचे वर्तन याेग्य नव्हते. नितीश त्यांच्या उमेदवारीच्या वेळी आले नव्हते. नंतर विधानसभेत भेटले. जदयू नेते मला कालिदास व दलाल संबाेधतात. ही गाेष्टी लाेजपा कार्यकर्त्यांना संताप आणणारी आहे. एनडीएतील सहकारी पक्षाबद्दल असे बाेलणे लाेजपा-भाजपाच्या संबंधात दरी निर्माण करणारे ठरेल. बिहारमध्ये रालाेआ सरकार महाआघाडीच्या अजेंड्यावर काम करत आहे. सात निश्चय-२०१५ मध्ये ही याेजना जदयू-राजद-काँग्रेसने तयार केली हाेती. पंधरा वर्षांपासून सत्तेवर असूनही पुराविषयी ठाेस पावले उचलण्यात आली नाहीत. काेराेनाला निपटण्यासाठी काहीही पावले उचलण्यात आली नाहीत, असा आराेपही करण्यात आला.