आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Major Blow Against Terror Funding; 106 Members Of PFI Arrested, NIA ED Raids In 15 States

टेरर फंडिंगविरुद्ध सर्वात मोठा घाव:PFIचे 106 सदस्य अटकेत, एनआयए-ईडीचे 15 राज्यांत छापे, महाराष्ट्रात 12 शहरांत कारवाई

नवी दिल्ली/जयपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळात छापेमारी करताना एनआएचे पथक. - Divya Marathi
केरळात छापेमारी करताना एनआएचे पथक.
  • रात्री १ ला सुरू झालेले छापे सकाळपूर्वी संपले, केरळात सर्वाधिक २२ जणांना अटक

देशविरोधी शक्तींचे कंबरडे तोडण्यासाठी एनआयए आणि ईडीने बुधवारी संयुक्त कारवाई करत प्रथमच १५ राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) ९३ ठिकाणांवर छापे टाकले. ही देशात प्रथमच एखाद्या संघटनेविरुद्धची सर्वात मोठी कारवाई आहे.

संघटनेच्या सर्वोच्च नेत्यांसह १०६ सदस्यांना अटक करण्यात आली. त्यात केरळचे सर्वाधिक २२, महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रत्येकी २०, तामिळनाडूतील १०, आसामचे ९, यूपीचे ८, आंध्रचे ५, मध्य प्रदेशचे ४, पुड्डुचेरी व दिल्लीतील प्रत्येकी ३ आणि राजस्थानमधील दोघांचा समावेश आहे. बिहार, प. बंगाल, तेलंगण, गोवा, मणिपूरमध्येही छापे पडले. सर्वोच्च नेत्यांत संघटनेचे अध्यक्ष ओ.एम. सलेम, केरळचे प्रमुख मो. बशीर, राष्ट्रीय सचिव व्ही. पी. नझरुद्दीन यांचा समावेश आहे. कारवाईला ‘ऑपरेशन मिडनाइट’ नाव दिलेे होते. ऑल इंडिया पसमंदा मुस्लिम महाजने ही कारवाई देशहिताची असल्याची टिप्पणी केली.

महाराष्ट्रात १२ शहरांतून २० जणांना अटक

टेरर फंडिंगप्रकरणी राष्ट्रीय गुप्तचर तपास संस्था व दहशतवादविराेधी पथकाने गुरुवारी राज्यातील विविध शहरांत पहाटे छापेमारी करत पीआयएफ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेच्या २० जणांना अटक केली. नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, मालेगाव , परभणी, नांदेड, जालना आणि धुळ्यात पथकाने कारवाई करत २० जणांना अटक केली, तर अनेकांची चौकशी केली. मराठवाड्यातून १३ जणांना अटक करण्यात आली. मालेगावातून या संघटनेचा नाशिकचा जिल्हाध्यक्ष माैलाना सहेफू रहेमान सईद अहमद कासमी याला हुडकाे भागातून अटक करण्यात आली.

कारवाईत माैलानाच्या घरातून संगणक, धार्मिक पुस्तके, महत्त्वाचे दस्तऐवज व माेबाइल जप्त केल्याचे सांगण्यात आले. पुण्यात पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातील तिघांना चौकशी करून सोडले. अब्दुल कय्युम शेख (रा. कोंढवा) आणि रब्बी अहम खान (रा.अशोका म्युज, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रब्बी खान हा संघटनेचा माजी राज्य सचिव तर अब्दुल शेख हा शहर उपाध्यक्ष आहे. मुंबईच्या काली चाैकी पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अकाेला येथील एटीस पथकाने जळगावच्या मेहरुण परिसरातील दत्तनगरातील एका धार्मिक स्थळातून संशयित अब्दुल हदरी (३२, रा. रहमान गंज, जालना) याला अटक केली. कोल्हापुरातील जवाहरनगर येथील साहिल अपार्टमेंटमधून अब्दुल मौला मुल्ला याला अटक करण्यात आली.मराठवाड्यातून १३ जणांना अटक

औरंगाबादेत हाेते मुख्यालय

एटीएस आणि एनआएच्या पथकाने मराठवाड्यातून १३ कार्यकर्त्यांना अटक केली. परभणीतून ४, नांदेड व बीडमधून प्रत्येकी १ तर जालन्यातून तीन जणांचा समावेश आहे. औरंगाबाद येथून पाच जणांना अटक करण्यात आली. परभणीतून अब्दुल सलाम अब्दुल कय्युम (३४), मोहंमद निसार मोहंमद अब्दुल रशीद (४१), मोहंमद जावेद मोहंमद शब्बीर अन्सारी (३५), मोहंमद अब्दुल करीम अब्दुल हलीम (३७) यांना ताब्यात घेतले. नांदेडमधून मोहंमद मेहराजोद्दीन अब्दुल हई अन्सारी याला देगलूर नाका परिसरातून अटक केली. एटीएसच्या पथकाने परभणी व नांदेडमधील या पाच जणांना न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश कीर्ती जैन- देसरडा यांनी ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले. दुसरीकडे, जालन्यातून तिघांना व बीडमधून एकाला अटक केली.

या तीन कारणांमुळे कारवाई

विदेशातून निधी : पीएफआयला सौदी अरब, ओमान, कतार, कुवेत, यूएई व बहरीनमधून निधी. हवालामार्गे, फॅमिली मेंटेनन्स म्हणून बोगस खात्यांत जमा केला जाई.

दहशतवादाचे प्रशिक्षण : पीएफआय मार्शल आर्ट, कुंग फू व जिमच्या आडून दहशतवादाचे प्रशिक्षण देत असल्याचे आयबीला इनपुट. निजामाबादसह आंध्रात अनेक कॅम्प.

युवकांचे ब्रेनवॉश: सीएए, नूपुर शर्मांविरुद्धच्या निदर्शनांत सहभाग. दिल्ली दंगल, उदयपूरचे कन्हैयालाल व अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्येत पीएफआयच्या लोकांना अटक झाली. युवकांचा ब्रेनवॉश करून संघटनेत घेत.

दिव्‍य मराठी Insight : अडथळा येऊ नये यासाठी रात्रीतून छापे

पीएफआयवरील एवढ्या मोठ्या कारवाईचे नियोजन देशातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले होते. विरोध होऊ नये, अंदाज येऊ नये, अशी सर्व काळजी घेऊन रात्रीतून कारवाईला सुरुवात केली. तेलंगणच्या निजामाबादमध्ये कराटे ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली अतिरेकी प्रशिक्षण केंद्र चालवण्याच्या प्रकरणात एनआयएने अब्दुल कादर आणि त्याच्या माहितीवरून चौघा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. येथूनच पीएफआयच्या टेरर फंडिंगचे मॉडेल उघड झाले. पीएफआयचे ५० लोक याचा वापर देशविरोधी कारवायांसाठी करत होते, हे समजले. यावर एनआयएचे डीजी दिनकर गुप्ता आणि आयबी संचालक तपन डेका यांनी गृहमंत्री अमित शहा यांना याची माहिती दिली. हवाला आणि टेरर फंडिंगचे प्रकरण होते, त्यामुळे ईडीच्या संचालकांनाही सहभागी करून घेतले. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक घेतली. त्यात सर्व आरोपींना अटक केली जावी,असे निश्चित झाले. कारवाई दिवसा झाल्यास त्यातील काही फरार होतील किंवा पीएफआय सदस्यांकडून व्यत्यय आणण्याची समस्या होती. त्यामुळे एनआयए-ईडीने संयुक्त कारवाई करावी आणि रात्रीतून त्याला मूर्त स्वरूप द्यावे,असे निश्चित झाले. कारवाईसाठी १५ राज्यांसाठी ६ कोऑर्डिनेशन सेंटर स्थापन केले.

त्याचे कंट्रोल टॉवर दिल्लीच्या एनआयचे मुख्यालयात केले. बुधवारी रात्री जवळपास ११.०० वाजता सर्व समन्वय केंद्रांनी सीएपीएफ आणि राज्यांच्या पोलिसांना छाप्याची माहिती देऊन टीमला अलर्टवर ठेवले. रात्री १२.०० वाजता ठिकाण आणि टार्गेट दिले. संयुक्त कारवाई रात्री १.०० वाजता सुरू होऊन, सकाळी ६ वाजेपर्यंत चालली. सकाळी जेव्हा लोकांना कळाले तोवर कारवाई पूर्ण झाली होती. गुरुवारी दुपारी १२ वाजता गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृह सचिव अजयकुमार भल्ला, एनआयए डीजी, आयबी डीजी तपन डेका आणि ईडी संचालकांसोबत बैठक केली. ही दीड तास चालली. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार कारवाई पीएफआयवरील बंदीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. काही महिन्यांनंतर संघटनेवर बंदी घातली जाईल.

अशी आहे पीएफआय

२००६ मध्ये केरळमध्ये स्थापन या संघटनेचे मुख्यालय दिल्लीत आहे. सुरुवातीपासूनच या संघटनेवर कट्टरपंथी इस्लामला प्रोत्साहन दिल्याचे आरोप झाले. सीएए आणि एनआरसीविरोधातील अराजकता आणि दिल्ली-कानपूर दंगलीच्या कटातही तिचे नाव आले. हाथरसमध्ये दलित मुलीवरील सामूहिक अत्याचारानंतर आणि हिजाब वादातही संघटनेचा संबंध असल्याचे दिसले. अनेक राज्यांत पीएफआयच्या सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्याच्याच आधारावर ही कारवाई झाली.

बातम्या आणखी आहेत...