आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Man Died On The Street, His Body Taken From A Garbage Truck Out Of Fear Of The Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमानवीय कृत्य:रस्त्यावर झाला व्यक्तीचा मृत्यू, कोरोनाच्या भीतीपोटी कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह

लखनऊ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशातील बलरामपूर नगरपालिकेचे अमानवीय कृत्य

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून 160 किलोमीटर दूर बलरामपुर जिल्ह्यातील एका नगरपालिकेचे अमानवीय कृत्य समोर आले आहे. बुधवारी  झालेल्या या घटनेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाला कोरोनाच्या भीतीने कचरा गाडीतून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेदरम्यान काही पोलिस कर्मचारी आणि एक अँब्यूलन्सदेखील उभी होती. पण, कोरोनाच्या भीतीने अँब्यूलन्स कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने मृतदेहास हात लावण्यास नकार दिला.

बलरामपुर जिल्ह्यातील उतरौला तहसीलमध्ये मोहम्मद अनवर नावाचे व्यक्ती कामानिमित्त आले होते. तहसील गेटबाहेर ते चक्कर येऊन पडले, त्यानंतर काही लोकांनी याबाबत पोलिस आणि अँब्यूलन्सला माहिती दिली. घटनास्थळी पोलिस आणि अँब्यूलन्स आली, पण त्यांनी मृतदेहाला कोरोनाच्या भातीने हातदेखील लावण्यास नकार दिला. त्यानंतर नगरपालिकेच्या कचरा गाडीला बोलवण्यात आले, त्यातून मृतदेह नेण्यात आला. डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली. परंतू, अद्याप मृत्यू कोरोनामुळे झाला, याबाबत ठोस माहिती मिळाली नाही.

बलरामपुरचे पोलिस अधिकारी देवरंजन वर्मा एका वृत्तवाहिनीला म्हणाले की, हे खूप अमानवीय आणि अपमानजनक व्यवहार आहे. जर त्यांना कोरोनाचा संश होता, तर त्यांना पीपीई किट घालून मृतदेहाला उचलायला हवे होते. याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईळ,'असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...