आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात अफुची नशा करणाऱ्या मुलाने कुटुंबच संपवले:आई-वडिलांना मारल्यानंतर मुलांची हत्या करत केली आत्महत्या

जोधपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफुची नशा करणाऱ्या एका माथेफिरूने आपले संपूर्ण कुटुंब संपवून स्वतः आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या जोधपूरमधून समोर आली आहे. आई-वडील आणि दोन मुलांच्या हत्येनंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली. ही ह्रदयद्रावक घटना जोधपूरच्या लोहावटमधील पीलवा गावात घडली आहे. गावात एकादच 5 मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

माथेफिरू तरुणाने सुरुवातीला गुरुवारी सायंकाळी शेतात काम करणाऱ्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. नंतर घरी आल्यावर त्याने कुटुंबीयांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या कालवल्या. कुटुंबातील आई आणि दोन मुले यामुळे बेशुद्ध झाल्यानंतर त्याने त्यांना पाण्याच्या टाकीत फेकून दिले. यानंतर तो थोड्या अंतरावरील मामाच्या घरी गेला आणि तिथे टाकीत उडी घेतली.

लोहावट ठाण्याचे सीआय बद्री प्रसाद यांनी सांगितले की, किसन शंकर लाल याने आधी त्याचे वडील सोनाराम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि तो तिथून पळून गेला. जखमी सोनाराम यांना काही लोकांनी रुग्णालयात नेले, जिथे उशीरा रात्री त्यांचा मृत्यू झाला.

घरी आल्यानंतर शंकर लालने कुटुंबीयांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या कालवल्या. यामुळे सर्व जण बेशुद्ध झाले. नंतर त्याने आई चंपा यांना पाण्याच्या टाकीत फेकले. नंतर मुलगा लक्ष्मण आणि दिनेशलाही पाण्याच्या टाकीत फेकले. तो दोन दिवसांपासून कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या देत होता असेही सांगितले जात आहे.

शुक्रवारी सकाळी लोकांना पाण्याच्या टाकीत मृतदेह तरंगताना दिसले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शंकर लालला अफुचे व्यसन होते. पत्नी मैनाशीही त्याचे पटत नव्हते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...