आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Man Who Joined The Agitation At Singhu Border Fled In A Police Vehicle, Attacked SHO With Sword, Farmers Protest News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:सिंघू बॉर्डरवर आंदोलनात सामील झालेल्या व्यक्तीने पोलिसांची गाडी घेत काढला पळ, SHO वर केला तलवारीने हल्ला

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी हे दिल्लीच्या वेगवेगळ्या सिंमावर मागील 84 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यात सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात सहभागी एका व्यक्तीने पोलिसांवर तलवारीने हल्ला करत पोलिसांची गाडी घेवून तेथून पळ काढला. जखमी SHO ला त्यानंतर हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले.

पोलिसांनी बुधवारी सांगितले की संबंधित प्रकरणामधील आरोपीचे नाव हरप्रीत सिंग असून त्याने सिंघू बॉर्डरवर रात्री 8 वाजता हा गुन्हा केला. पोलिस आरोपीचा पाठलाग करत असतांना तो एका व्यक्तीची गाडी हिसकावून फरार झाला, त्यानंतर पोलिसांनी PCR व्हॅनचा वापर करत रात्री 8.30 वाजता त्याला पकडले.

सुत्रांच्या माहितीनुसार आरोपी हा मानसिकदृष्टया स्थिर नाही, परंतु दिल्ली पोलिसांनी या दाव्याची पुष्टी दिली नाही. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे की आरोपीला अटक करण्यात आली असून संबंधित प्रकराणात पुढील तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...