आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयोध्येत शरयूकिनारी दक्षिणा काेरियाच्या महाराणी ‘हो’ यांच्या स्मरणार्थ २० एकरमध्ये एक स्मारक बांधले जात आहे. ते बघण्यासाठी दक्षिण कोरियाचे संरक्षणमत्री सू वुक अयोध्येला आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २४ कोटी रुपये खर्च करून हे स्मारक बांधले जात आहे. संरक्षणमंत्री सू वुक यांनी स्मारक परिसराची पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली.
अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांनी सांगितले की, संरक्षणमंत्र्यांनी पाहणीच्या वेळी सांगितले की, हे स्मारक भविष्यात आग्राच्या ताजमहालासारखे प्रसिद्ध होईल. त्यातून भारत-दक्षिण कोरियाचे संबंध मजबूत होतील. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी एका संदेशाने प्रेरित होत अयोध्येची तत्कालीन राजकुमारी ‘हो’ जलमार्गाने कोरियात आल्याची दक्षिण कोरियात म्हटले जाते. तेथे तिचा विवाह राजा सुरो यांच्याशी झाला. राजा सुरो यांना कोरियातील सर्वात प्रभावशाली राजा म्हटले जाते. आजही राजा सुरो व राणी हो यांचे वंशज कोरियात प्रभावशाली आहेत. अयोध्येत २००१ मध्ये सुमारे दोन एकर परिसरात राणी ‘हो’ यांचे स्मारक बांधले होते. आता त्याचा विस्तार केला जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.