आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख स्वामी शताब्दी महोत्सव:महिनाभर फेस्टिव्हल ऑफ इन्स्पिरेशन, 60 लाख लोक येणार

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रमुख स्वामींच्या १०० व्या जन्मोत्सवानिमित्त शताब्दी महोत्सव होत आहे. तो २०२१ मध्ये होणार होता. मात्र, कोरोनामुळे १ वर्ष पुढे ढकलला. १४ डिसेंबरला पीएम मोदी त्याचे उद्घाटन करतील. स्वामीनारायण संप्रदाय मानणारे सेवा देण्यासाठी जगभरातून एकवटत आहेत.

स्वामी महाराजांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आपण त्यांच्यासाठी १ महिना देऊ शकत नाही का? याच विचारातून गुजरातमध्ये अहमदाबादच्या पश्चिम भागातील रिंगरोडमध्ये वसवलेल्या प्रमुख स्वामीनगरात ५० ते ७५ लाख लोक १५ डिसेंबरपासून १५ जानेवारीपर्यंत एकत्र येतील. कुणी अमेरिकेतून नोकरी सोडून तर कुणी अन्य देशांत जम बसलेल्या व्यवसायातून ब्रेक घेत, कुणी शिक्षण सोडून आला. एकूण ८० हजार स्वयंसेवक असून ते महिनाभर सेवा देतील. यामध्ये १३०० महिलाही असतील,ज्या प्रेमवती नावाने तयार भोजनाचे व्यवस्थापन करतील. २ हजारांहून जास्त मुले हे मुलांच्या संस्कार आणि ज्ञानासाठी तयार केलेल्या बालनगरीचे संचालन करतील. त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी शालेय शिक्षकही असतील. १२०० स्वच्छता कर्मचारी २४ तास स्वच्छतेवर लक्ष देतील. अमेरिका, ब्रिटन, आफ्रिकी देश, जपान, यूएईसह अनेक देशांतील विविध दिग्गज महागनर पाहण्यासाठी येतील. ब्रिटिश शाही कुटुंब आपला व्हिडिओ संदेश पाठवेल. आपल्या वाचकांपर्यंत या धर्म व ज्ञानाच्या महाकुंभाची माहिती पोहोचवण्यासाठी भास्कर ६०० एकरात विस्तारलेले महाकुंभ स्थळ पाहण्यासाठी सायं.५.३० वाजता महानगर द्वारावर पोहोचला. तेथे महाद्वारातून मला प्रवेश मिळाला. हे ५१ फूट उंच आणि २८० फूट रुंद आहे. याचे नाव ठेवले आहे संत द्वार. तेथे ब्रह्मबिहारीजी भेटले. त्यांच्यासोबत या महानगराची पाहणी केली.

आतमध्ये प्रवेश करताच प्रमुख स्वामींची मूर्ती..: सुरुवात सांस्कृतिक द्वाराने. २८० फुटांचे हे द्वार सर्वात मोठे आहे. यावर अहिल्याबाई यांच्यापासून अन्य संत-महात्म्यांचे विशाल पुतळे कोरले आहेत. परिसरात दोन्ही बाजूस आणखी ११६ फूट लांब आणि ३८ फूट उंच ३-३ द्वार बनवले आहेत. ३ द्वार प्रवेश, ३ परिसरातून बाहेर जाण्यासाठी. दरवाजातून पुढे जात प्रमुख स्वामींची विशाल मूर्ती दिसते. ३० फूट उंच ही मूर्ती १५ फूट उंच आसनावर विराजमान आहे. मूर्तीच्या चहुबाजूने महाराजांची २४ तासांची दिनचर्या रेखाटली आहे. संत द्वार आणि मूर्ती यांच्यात उजवीकडे संत प्रवचनाचे स्थळ आहे. पुढे दिल्लीच्या अक्षरधामची प्रतिकृती दिसते. ६७ फूट उंच या विशाल प्रतिकृतीत भगवान स्वामीनारायण आणि अन्य देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन होतील.

कोट्यवधी खर्च, सर्व दानातून मिळाले ब्रह्मबिहारी यांनी सांगितले की, तात्पुरते मंदिर, मूर्ती आणि संपूर्ण परिसर तोडला जाईल. आम्हाला जशी जमीन मिळाली तशीच परत करू. पाडायचे असेल तर एवढा खर्च का? यावर ते म्हणाले, आमचा पैसा लागला नाही. सर्व भक्तांनी दान दिला आहे. ही सर्व सेवा आहे. भक्त म्हणतात- सर्व स्वामीनारायणांच्या आशीर्वादातून मिळाल्याने त्यांनाच समर्पित करत आहोत. सेवक खड्डे खोदण्यापासून प्रत्येक कामात आपला सहभाग नोंदवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...