आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुपेरी पडद्यावर काश्मीरचे सौंदर्य पुन्हा झळकत आहे. गेल्या २ वर्षांच्या काळात बॉलीवूडचे २०० चित्रपट, वेब सिरीज व अल्बमच्या शूटिंगला मंजुरी देण्यात आली. हा गेल्या ३४ वर्षांचा विक्रमी आकडा आहे. काश्मिरात ९० च्या दशकाच्या प्रारंभापासून दहशतवाद उफाळत होता. आता सुरक्षेच्या दृष्टीने स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. बॉलीवूडसह दक्षिण भारतीय निर्मातेही येथे शूटिंग करत आहेत. जम्मू-काश्मीर फिल्म विकास परिषदेची (जेकेएफडीसी) स्थापना २०२१ मध्ये झाली. शूटिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्सची व्यवस्था आहे.
जेकेएफडीसीच्या स्थापनेनंतर १००० पेक्षा अधिक कलावंतांची नोंदणी आतापर्यंत जवळपास एक हजाराहून अधिक कलावंतांची जेकेएफडीसीमध्ये नोंदणी आहे. यामुळे स्थानिक कलावंतांना सहजपणे काम मिळते. एक स्थानिक निर्माते जहूर अहमद म्हणतात, कलावंतांसोबतच चित्रपट निर्मितीशी संबंधित लाइन प्रोड्यूसर, तंत्रज्ञ व कॅमेरामनलाही बऱ्यापैकी काम मिळत आहे.
नवे डेस्टिनेशन : जम्मू-काश्मीरपैकी चित्रपटांची ९०% श्ूटिंग काश्मिरात होते. निर्माते आता काश्मीरच्या गुलमर्ग, पहलगाम, दल सरोवर आदी पारंपरिक स्थळांशिवाय बांदीपोरातील गुरेज व वुलर, दूधपथरी, योशमर्ग आदी नव्या डेस्टिनेशनमध्ये शूटिंग करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.