आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Person Who Reached The Temple 387 Km Away After Buying A New Bullet Fired A Bullet; Watch The Video

रॉयल एनफिल्डला आग:नवीन बुलेट खरेदी करून 387 किमी दूर मंदिरात पोहोचलेल्या व्यक्तीच्या बूलेटला लागली आग

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रॉयल एनफिल्ड बुलेटला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होते आहे. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधील कासापुरम अंजनेय स्वामी मंदिराच्या बाहेरचा आहे. बुलेटला आग लागल्याची घटना ही मंदिरासमोर घडली.

काय आहे प्रकरण?

  • हे प्रकरण कर्नाटकातील म्हैसूर येथील आहे. येथे राहणारे बाइकर रविचंद्र यांनी नवीन रॉयल एनफिल्ड बुलेट खरेदी केल्यानंतर आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील कासापुरम अंजनेय स्वामी मंदिरात पूजेसाठी 387 किमी चालवले. उगादी निमित्त स्वामींची रथयात्रा काढली जाते, ज्यामध्ये नववर्षानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने लोक येतात. रविचंद्रही पूजेसाठी पोहोचले होते. मात्र अचानक त्यांना बुलेट ने भरस्त्यात पेट घेतला.
  • बुलेटने पेट घेतल्याने मंदिराबाहेर गोंधळ उडाला. अचानक आगीच्या ज्वाळांची तीव्रता वाढू लागली आणि काही सेकंदानंतर बुलेटचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले, या आगीमध्ये बुलेटचा चक्काचूर झाला. बुलेट जवळ उभ्या असलेल्या गाड्यांना आग लागली. मात्र इतर गाड्यांना लागलेली आग आटोक्यात आणली

यापूर्वी ईव्हीमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अलीकडेच इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या 3 घटना घडल्या आहेत. पुण्यात सर्वप्रथम ओला ई-स्कूटरला आग लागली. काही दिवसांनंतर, वेल्लोरमध्ये अशीच एक घटना घडली ज्यामध्ये ओकिनावामधील एका ई-स्कूटरला आग लागली. यानंतर प्युअर ईव्ही ई-स्कूटरलाही आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...