आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Police Constable Was Shot Dead In An Encounter With Militants In Srinagar |Marathi News

अतिरेक्यांशी चकमक:अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू, श्रीनगरमधील घटना

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या सौरा भागात मंगळवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. चकमकीत एक अतिरेकी जखमी झाला.

काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले की, एका कारमध्ये तीन अतिरेकी असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी या भागात गुप्त मोहीम हाती घेतली. पोलिस अतिरेक्यांचा पाठलाग करत होते. त्यावेळी झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याला गोळी लागली.

अतिरेक्यांच्या गोळीबारात कुपवाडा येथील कॉन्स्टेबल आमिर हुसैन लोन जखमी झाले. लोन यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांपैकी दोघांची ओळख पटली असून बासित आणि रेहान अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी या महिन्यात ११ अतिरेक्यांना ठार केले आहे, तर १३ जणांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...