आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Political Leader Never Retires; The Guide Is The Copyright Of Those Half Pantwals After The Concept: Lalu Prasad Yadav; News And Live Updates

मुलाखत:राजकीय नेता कधीच निवृत्त होत नाही; मार्गदर्शक ही संकल्पनातर त्या हाफ पँटवाल्यांचे कॉपीराइट आहे : लालूप्रसाद यादव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी प्रसार माध्यमाला दिलेली पहिली मुलाखत

राष्ट्रीय जनता दलाच्या स्थापनेला आज २५ वर्षे पूर्ण झालीत. लालूप्रसाद यादव यांनी १९९७ मध्ये जनता दलातून वेगळे होऊन राजद स्थापन केला. विरोधकांचे आरोप व कोर्टाचा सामना करत लालूंनी ‘कंदिला’च्या जोरावर सरकार बनवले, टिकवले. विरोधकांत राहूनही राजदची प्रतिष्ठा जपली. जामीन मिळाल्यानंतर दिल्लीत उपचार घेणाऱ्या लालूंनी पक्षाच्या रजत महोत्सवानिमित दैनिक भास्करच्या इंद्रभूषण यांच्याशी बातचीत केली. त्यातील मुख्य मुद्दे..

राजकारणात पुन्हा सक्रिय होणार की मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार?
नेता कधीच निवृत्त होत नाही. राजकीय सक्रियतेचा अर्थ संसद आणि विधानसभा निवडणूकच असतो का? माझे राजकारण शेत-शिवारांपासून ते सामाजिक न्याय आणि शेवटच्या स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी आहे. मार्गदर्शक तर त्या हाफ पँटवाल्यांचे कॉपीराइट आहे. आम्ही गरिबांच्या हक्काच्या लढाईसाठी जन्मलो आहोत.

लालू-राबडीची १५ वर्षांच्या तुलनेत नितीश यांची १५ वर्षे कशी पाहाल?
ही तुलना पूर्वग्रहविना करावी लागेल. १९९०-२००५ मधील शासनाचे सामाजिक - आर्थिक विश्लेषण करून आमच्या कामाचे आकलन करावे लागेल. ज्या समाजात कूळ, जन्माच्या आधारावर दुसऱ्याला तुच्छ समजले जाते त्या समाजात मोठमोठ्या इमारती, पूल आणि विमानतळांच्या कौतुकांचा काय उपयोग? आधी सर्वांना समान शिक्षण व आरोग्य द्यायला हवे. वंचित, उपेक्षितांना वाटा द्यावा लागेल. आम्ही तेच केले. नितीश यांच्या २००५-२०२१ या काळात प्रचारावर आधारित प्रशासन बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशाने ओळखले आहे. आता तर त्यांचे मंत्री आणि आमदारच त्यांच्या कार्यशैलीतील काळी बाजू प्रकाशात आणत आहेत.

लालू आणि नितीश पुन्हा सोबत येऊ शकतील का?
हा तर काल्पनिक प्रश्न आहे. २०१५ मध्ये आम्ही नितीश यांच्या सर्वच अांतर्विरोधांना बाजूला ठेवत महाआघाडीचा विजय निश्चित केला. जास्त जागा जिंकल्या. परंतु त्यांना मुख्यमंत्री केले. काय झाले? त्यांनी पावणेदोन वर्षातच त्या जनादेशाचे काय केले हे संपूर्ण देशाने पाहिले. राजकारणात सिद्धांत, विचार, धोरण, नशीब आणि राजकीय कण्याचे महत्त्व नितीश गमावून बसले आहेत.

तुम्ही किंगमेकर आहात, राष्ट्रीय स्तरावर कोणत्या पर्यायांवर काम करणार?
हे किंगमेकर काय आहे? हे माध्यमांनी दिलेले नाव आहे. बरे झाल्यानंतर ज्यांच्या प्रेमाने मला बनवले, घडवले त्या जनतेत मी जाणार आहे.

२०२४ मध्ये मोदींना पर्याय कोण?
जो कोणी असेल तो हुकूमशहा, अहंकार आणि आत्ममुग्धतेपासून दूर असेल. मागील ६ वर्षांतील शासनामुळे एक तर निश्चित झाले की आत्मकेंद्रित आणि व्यक्तिकेंद्रित शासन लोकशाहीची मुळे कधीच मजबूत करू शकत नाही.

तुमच्या शासनकाळात कायदा व सुव्यवस्थेत चूक झाली, जंगलराजचा मुद्दा अजूनही कायम आहे, हे मान्य करता का?
बिहारच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन कोणत्याही जातीच्या समान्य कुटुंबाला विचारा, सत्ताधारी आमदाराला विचारा तो आजच्या महाजंगलराजची ओळख करून देईल. राजकीय नेता कधीच निवृत्त होत नाही...मात्र, त्या काळात जंगल राज म्हणून ओरड करणारे अधिकांश लोक माझ्या सत्तेमुळे ज्यांचे महत्त्व कमी होत गेले तेच लोक होते. त्या १५ वर्षांत (१९९०-२००५) आणि गेल्या १५ वर्षांतील (२००६-२०२१) गुन्हेगारीची सरकारी आकडेवारी नि:पक्षपणे तपासावी, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडीवारीही तुलनात्मक पडताळावी, यातून सत्य काय ते कळेल.

तुमच्यासारखा लोकनेता म्हणून तेजस्वीची प्रतिमा घडू शकेल? जदयू-भाजप आरोप करतात की ते कायम दिल्लीतच राहतात.
तेजस्वी सक्रिय असल्यामुळेच नितीश यांचा पक्ष ४० जागांवरच आटोपला. नितीश १६ वर्षांपासून सत्तेत आहेत. स्वत: काहीच करत नाहीत. कोरोनात चार महिने घाबरून घराबाहेर पडलेच नाहीत. दुसरीकडे तेजस्वी पूर असो वा दुष्काळ, बेरोजगारीचा मुद्दा लावून धरत राज्यभर फिरला. मुजफ्फरपूर बालिका प्रकरणात तर दिल्लीत जंतर-मंतरपर्यंत धडक मारली. जुलै २०१७ मध्ये सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तेजस्वीने जिल्हा स्तरापासून पंचायत पातळीपर्यंत १८००० किमी प्रवास केला. तीन वेळा त्याने बिहार भ्रमण केले आहे.

पेट्रोल १०० आणि मोहरी तेल २०० रुपये पार गेले तरी विरोधक महागाईचा मुद्दा व्यवस्थितपणे उचलू शकले नाहीत?
हे अर्धसत्य आहे. सत्तेच्या चष्म्यातून याकडे पाहू नका. विरोधकांच्या आंदोलनाला कव्हरेज मिळते का? स्वातंत्र्यानंतर देशात या प्रकारचे हुकूमशाही आणि लोकविरोधी सरकार ना पाहिले असेल ना ऐकले असेल. वेळ आली की जनतेमध्ये हळूहळू बंड पेटते मग मोठमोठ्या हुकूमशहांना त्यांची जागा दाखवली जाते.

बातम्या आणखी आहेत...