आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेणखत रासायनिक खताला पर्याय ठरू शकते:गोशाळांच्या नोंदणीसाठी पोर्टल सुरू व्हावे, नीती आयोगाची सूचना

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीसाठी शेण आणि गोमूत्र आधारित खताचा वापर केला पाहिजे,असे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाने(नीती आयोग) म्हटले आहे. यासोबत गोशाळांना आर्थिक मदतही दिली पाहिजे. या शिफारसीचा अहवाल आयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी जारी केला आहे.त्यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील शेतीची ताकद पिकांसोबत पशूधनात आहे. यासोबत कार्यबलाने सांगितले की, सर्व अनुदाने गायींच्या संख्येशी जोडली पाहिजेत. अहवालानुसार, सर्व गोशाळांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी दर्पण पोर्टलसारखे पोर्टल बनवले जावे.

याच्या माध्यमातून पशू कल्याण मंडळाची मदत घेतली जाऊ शकते. अहवालानुसार, ब्रँड विकासासह गायीच्या शेणावर आधारित सेंद्रिय खतांचे व्यावसायिक उत्पादन, पॅकेजिंग, विपणन आणि वितरणला प्रोत्साहन देण्यासाठी विशिष्ट धोरणात्मक उपाय व पाठिंब्याची गरज आहे. आयोगाचे वरिष्ठ सल्लागार(कृषी) डॉ. नीलम पटेल म्हणाले, गोशाळा नैसर्गिक शेती व सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात मदत करू शकते.रासायनिक खतांऐवजी शेणखताने बदल घडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...