आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Record 20.55 Lakh Samples Of Corona Testing Were Done In The Last 24 Hours In The Country, The Highest In The World; So Far, More Than 32 Crore 23 Lakh Tests Have Been Done

देशात कोरोना चाचण्यांचा विक्रम:एका दिवसात 20.55 लाख नमुन्यांची चाचणी, हे जगातील सर्वात जास्त; आतापर्यंत 32 कोटी 23 लाखांपेक्षा जास्त टेस्ट झाल्या

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमचे लक्ष्य जूनपर्यंत 45 लाख टेस्ट करण्याचे आहे : डॉ. भार्गव

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रीपल-टी म्हणजेच टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रेकिंगवर जोर दिला जात आहे. या अंतर्गत बुधवारी विक्रमी 20 लाख 55 हजार 10 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात एका दिवसात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा सर्वात मोठा आकडा आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशभरात आतापर्यंत 32 कोटी 23 लाख 56 हजार 187 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी मंगळवारीही देशात विक्रमी 20 लाख 8 हजार 296 कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. तर 11 मे रोजीही 19 लाख 83 हजार 804 टेस्ट करण्यात आल्या होत्या.

आमचे लक्ष्य जूनपर्यंत 45 लाख टेस्ट करण्याचे आहे : डॉ. भार्गव
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलाराम भार्गव म्हणाले की, या महिन्याच्या अखेरीस 25 लाख टेस्ट आणि जून अखेरीस 45 लाख चाचण्या करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते म्हणाले की, फेब्रुवारीच्या मध्यापासून भारतात कोरोना संबंधित तपासणीची संख्या सातत्याने वाढत आहे आणि 12 आठवड्यांत ती 2.3 पट वाढली आहे.

लोकसंख्येनुसार दिल्लीत सर्वात चांगली टेस्टिंग, तर बंगाल सर्वात मागे
लोकसंख्येनुसार दिल्लीत सर्वाधिक नमुने घेण्याचे प्रमाण आहे. 2.2 कोटी लोकसंख्येमागे सुमारे 18 कोटी चाचण्या झाल्या आहेत. म्हणजेच चाचणी गुणोत्तर सुमारे 81.81% आहे. त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक आहे. येथे 6.6 कोटी लोकसंख्येमागे 2.8 कोटी चाचण्या घेण्यात झाल्या आहेत. येथे सँपलिंग रेट 42.42% आहे.

तर देशाची सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांविषयी बोलायचे झाले तर यूपीमध्ये 22.5 कोटी लोकसंख्येमागे 4.6 कोटी टेस्ट झाल्या आहेत. म्हणजेच येथे 20.44% सँपलिंग झाली आहे. महाराष्ट्रात हा आकडा 26.22% आहे.

UP आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त टेस्टिंग
राज्यांविषयी बोलायचे झाले तर उत्तर प्रदेशात सर्वात जास्त 4.6 कोटी टेस्टिंग करण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. येथे आतापर्यंत 3.2 कोटी सँपल घेण्यात आले आहेत. बिहार आणि कर्नाटकात एकसारखी 2.8 कोटी चाचण्यात झाल्या आहेत. मध्यप्रदेशात हा आकडा 89.9 लाख आहे.

राज्यटेस्टिंग
महाराष्ट्र3.2 कोटी
कर्नाटक2.8 कोटी
केरल1.8 कोटी
तमिलनाडू2.6 कोटी
उत्तर प्रदेश4.6 कोटी
आंध्र प्रदेश1.8 कोटी
दिल्ली1.8 कोटी
पश्चिम बंगाल1.2 कोटी
छत्तीसगढ़83.8 लाख
राजस्थान1.0 कोटी
गुजरात2.1 कोटी
मध्यप्रदेश89.9 लाख
हरियाणा84.8 लाख
बिहार2.8 कोटी
ओडिशा1.1 कोटी
तेलंगणा1.4 कोटी
पंजाब84.1 लाख
आसाम97.8 लाख
झारखंड78.9 लाख
उत्तराखंड43.7 लाख
जम्मू-कश्मीर80.5 लाख
हिमाचल प्रदेश17.8 लाख
गोवा7.7 लाख
पुद्दुचेरी9.5 लाख
चंडीगढ़4.7 लाख
त्रिपुरा8.1 लाख
मणिपुर6.7 लाख
मेघालय5.2 लाख
अरुणाचल प्रदेश5.2 लाख
नागालँड1.8 लाख
लडाख2.3 लाख
सिक्किम1.1 लाख
मिझोराम3 लाख
अंदमान-निकोबार3.8 लाख
लक्षद्वीप1 लाख
दादर आणि नगर हवेली----
एकूण32.23 कोटी
बातम्या आणखी आहेत...