आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिमला:फेब्रुवारीत एकाच दिवसात झाली विक्रमी 22.4 इंच बर्फवृष्टी, मैदानी भागात तीन दिवस सकाळी-रात्री थंडी वाढणार

सिमला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जानेवारीत बर्फवृष्टी तर दूरच, चांगला पाऊसही झाला नव्हता

पर्वतीय रहिवासी भागात विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे. २४ तासांत २२.४ इंच बर्फवृष्टीचा विक्रम झाला.सिमल्यात १९९० पासून नोंदी ठेवल्या जात आहेत. तेव्हापासून एका दिवसात एवढी बर्फवृष्टी कधीही झाली नाही. ही या हंगामातील शेवटची बर्फवृष्टी असू शकते. हवामान विभागानुसार, पुढील ७ दिवस हवामान स्वच्छ राहील. त्यानंतर पाऊस होईल. पहाडांवरून येणाऱ्या थंड हवेमुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, यूपी, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सकाळी आणि रात्री तापमान ३ ते ४ अंशांपर्यंत घसरू शकते.

हिमाचल : आकाश निरभ्र, तर थंडी वाढणार
हवामान विभागानुसार, आता आकाश निरभ्र झाल्याने रात्री थंडीचा कडाका वाढणार आहे.

काश्मीर : चारदा बर्फवृष्टी, तापमान वाढणार
काश्मीर खोऱ्यातही बर्फवृष्टीची शक्यता कमी. त्यामुळे कडक थंडीचा काळ संपला.

उत्तराखंड : शिखरांवरच बर्फवृष्टीची शक्यता
आता फक्त उंच शिखरांवरच सौम्य बर्फवृष्टी होण्याची शक्यता. शहरांत पाऊस पडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...