आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Reward Of 25 Lakhs Has Been Announced For The Capture Of Notorious Underworld Don Dawood Ibrahim

बक्षिसाची घोषणा:कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यास 25 लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गुंडांवर बक्षिसांची घोषणा केली आहे. एनआयएने बक्षिसांची ही यादी १८ ऑगस्टला जारी केली होती, ती गुरुवारी समोर आली. त्यानुसार, १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेसह अनेक दहशतवादी हल्ले आणि ड्रग तस्करी प्रकरणातील फरार आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. एनआयएने प्रथमच जाहीरपणे एवढ्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली. प्रथमच त्यांचे जुने आणि नवे फोटो जारी करण्यात आले.

गुंड आणि त्याच्यावर जाहीर केलेले बक्षीस : दाऊद इब्राहिम : २५ लाख, डी कंपनी : २० लाख, छोटा शकील : १५ लाख, अनीस इब्राहिम : १५ लाख, जावेद चिकना : १५ लाख, टायगर मेमन : १५ लाख, हाजी इमाम : १५ लाख.

बातम्या आणखी आहेत...