आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Scene Like A Film Fight In 'FIFA', The Iranian Goalkeeper Collapsed On The Field In The Match Against England

नाक फुटले, रक्त वाहिले..तरीही खेळले:इंग्लंड-इराण फुटबॉल सामन्यात फिल्मी सीन, इराणी गोलकीपर मैदानातच कोसळला

स्पोर्ट्स डेस्क15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोलकीपर अलिर्जा बैरनवंद व माजिद हुसैनी यांच्या धडकेमुळे सामना काहीवेळ थांबला.

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये इराणच्या संघाची चांगली सुरुवात झाली नाही. इंग्लंडने त्याचा 6-2ने पराभव केला. यावेळी एक दुर्दैवी अपघातही झाला. इराणी गोलकीपर अलिर्जा बेरनवंद आपल्याच संघाच्या खेळाडूला धडकला. यामुळे त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. या अनपेक्षित घटनेमुळे सामना काहीवेळ थांबला.

अलिर्जा बैरनवंद रक्त वाहत असतानाही मैदानावर पट्टी बांधून खेळू लागला. पण काही वेळातच तो मैदानात कोसळला. यामुळे त्याच्यावर स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्याची वेळ आली.

खेळाच्या 9व्या मिनिटाला झाला अपघात

सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 9 व्या मिनिटाला गोलकीपर अलिर्जा इंग्लंडच्या राइट विंगकडून वेगात येणारा फुटबॉल गोलमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याच्या दिशेने येणाऱ्या माजिद हुसैनीशी त्याची जोराची टक्कर झाली. त्यानंतर अलिर्जा मैदानात कोसळला.

3 फोटोंमध्ये पाहा कसे धडकले इराणी खेळाडू...

अलिर्जा गोल पोस्टकडे येणारा फुटबॉल रोखण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अचानक माजिद आला.
अलिर्जा गोल पोस्टकडे येणारा फुटबॉल रोखण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अचानक माजिद आला.
दोघांचे डोके एकमेकांना धडकले. अलिर्जाच्या नाकाला जबर मार लागला.
दोघांचे डोके एकमेकांना धडकले. अलिर्जाच्या नाकाला जबर मार लागला.
धडकेनंतर दोन्ही खेळाडू मैदानावर कोसळले.
धडकेनंतर दोन्ही खेळाडू मैदानावर कोसळले.

7 मिनिटे खेळ थांबला

या घटनेनंतर जवळपास 7 मिनिटांपर्यंत खेळ थांबला. इराणच्या वैद्यकीय पथकाने मैदानावर धाव घेऊन खेळाडूंवर उपचार केले. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला.

घटनेनंतर तत्काळ वैद्यकीय पथकाने मैदानावर धाव घेऊन उपचार सुरू केले.
घटनेनंतर तत्काळ वैद्यकीय पथकाने मैदानावर धाव घेऊन उपचार सुरू केले.
काही वेळ प्रयत्न केल्यानंतरही रक्त थांबत नसल्यामुळे बैरनवंदला जमिनीवर झोपवण्यात आले.
काही वेळ प्रयत्न केल्यानंतरही रक्त थांबत नसल्यामुळे बैरनवंदला जमिनीवर झोपवण्यात आले.
धडक एवढी वेगवान होती की बैरनवंदचे नाकच फुटले. तो काहीवेळ जमिनीवर तसाच पडून राहिला.
धडक एवढी वेगवान होती की बैरनवंदचे नाकच फुटले. तो काहीवेळ जमिनीवर तसाच पडून राहिला.
नाकातून रक्त निघाल्यानंतर इराणच्या वैद्यकीय पथकाने गोलकीपरची कनकशन टेस्ट केली.
नाकातून रक्त निघाल्यानंतर इराणच्या वैद्यकीय पथकाने गोलकीपरची कनकशन टेस्ट केली.

जखमेनंतरही खेळत राहिला

फीफाच्या इन्जरी रुलनुसार, डोके व तोंडावर सीरियस जखम झाल्यास खेळाडूला तत्काळ सब्स्टीट्यूट करावे लागते. पण पट्टी बांधल्यानंतर गोलकीपर उभा राहिला. त्यांनी मेडिकल टीमला आपण ठीक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपला खेळ सुरू ठेवला.

जखमी झाल्यानंतरही गोलकीपर अलिर्जाने खेळ सुरू ठेवला. फोटोत इराणचा कर्णधार मेहदी तरेमी व मॅच रेफरी त्याची स्थिती जाणून घेताना.
जखमी झाल्यानंतरही गोलकीपर अलिर्जाने खेळ सुरू ठेवला. फोटोत इराणचा कर्णधार मेहदी तरेमी व मॅच रेफरी त्याची स्थिती जाणून घेताना.
बैरनवंदला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
बैरनवंदला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

पहिल्या हाफमध्ये 14 मिनिटांचा इन्जरी टाइम

इंजरीनंतर गोलकीपर मैदानातून बाहेर गेला नाही. पण पहिल्या हाफच्या 17 व्या मिनिटाला तो मैदानावर कोसळला. त्यांच्या जागी पर्यायी गोलकीपर होसेन हुसैनी मैदानात आला. गोलकीपरच्या इंजरीमुळे फर्स्ट हाफच्या शेवटी 14 मिनिटांचा इंजरी टाइम जोडण्यात आला.

वर्णभेदाविरोधात इंग्लंडचा 'नी डाउन'

आज सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे सर्वच खेळाडू आपल्या गुडघ्यावर बसल्याचे दिसून आले. ते किक-ऑफपूर्वी जवळपास 3 सेकंद बसले. याद्वारे त्यांनी वर्णद्वेश व भेदभावाचा निषेध केला.

वर्णद्वेष व भेदभावाविरोधात इंग्लंडच्या सर्वच प्लेयर्सनी किक-ऑफपूर्वी 'नी डाउन' केले.
वर्णद्वेष व भेदभावाविरोधात इंग्लंडच्या सर्वच प्लेयर्सनी किक-ऑफपूर्वी 'नी डाउन' केले.
बातम्या आणखी आहेत...