आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Single President Does Not Mean A Women's Commission: Chitra Wagh |marathi News

उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून वाद:एकटी अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नसतो : चित्रा वाघ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हीही तिथे काम करून आलेलो आहोत. तुम्ही म्हणजे आयोग नाही, एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो. एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा, असे सांगत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना प्रत्त्युतर दिले. अशा ५६ नोटिसा मला आल्या आहेत. त्यात आणखी एक भर पडली, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.

मॉडेल उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून सुरू झालेला वाद आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवारी राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यावर आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर यांना उत्तर दिले. उर्फी जावेदवरील टीकेनंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या वादात उडी घेत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...