आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Special Eulogy Composed By Kailash Kher On Mahakaal Swayambhu Jyotirlinga Yajamehe In India...he Parbrahm Parameshwara Shiv Shambhu Dayamhe...!

कैलाश खेर यांचे महाकालवर निर्मित विशेष स्तुतिगीत:भारत मध्ये स्वयंभू ज्योतिर्लिंग यजामहे...हे पारब्रह्म परमेश्वर शिव शम्भू दयामहे...!

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैनमध्ये महाकाल लोक कॉरिडॉरचे उद्घाटन ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. या प्रसंगी गायक कैलाश खेर महाकालची पहिली स्तुती (अँथम) ‘जय श्री महाकाल’ गातील. ही स्तुती खेर यांनीच लिहिली अन् संगीतबद्धही केली आहे. हे गीत लिहिण्यासाठी खेर यांना १५ दिवस लागले आणि त्यासाठी ते तीनदा मुंबईहून उज्जैनला आले. गीत संगीतबद्ध करण्यासाठी त्यांनी पुंगी, बगलबच्चा, ऊद, रबाव, शहनाई, डमरू, शंख या पारंपरिक वाद्यांचा वापर केला आहे. खेर यांनी ही स्तुती ‘भास्कर’सोबत शेअर केली आहे. ते म्हणाले, ‘आपल्या कुठल्याही ज्योतिर्लिंगाला समर्पित कोणतेही विशेष स्तुतिगीत नाही.’ ‘जय श्री महाकाल’ ही स्तुती महाकाल यांना समर्पित असलेले पहिले अधिकृत गीत असेल. त्यात महाकालच्या समग्र इतिहासाचे दर्शन आहे. मी घागरीत सागर सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला पूर्ण आशा आहे की, हे गीत महादेवाच्या भक्तांशिवाय संगीत साधकांनाही पसंत पडेल. कारण, त्यात फक्त स्तुतीच नाही तर महत्त्वाची माहितीही आहे. त्याच्या रचनेतच एक नाद आहे, तो श्रोत्यांना थिरकण्यास बाध्य करेल. हे गीत तरुणांत अध्यात्माबाबत उत्सुकता निर्माण करेल.’ त्याचे संयोजन मध्य प्रदेशचा संस्कृती विभाग आणि खेर यांच्या कैलाशा एंटरनेटमेंट कंपनीने संयुक्तपणे केले आहे.

अशी आहे स्तुती भारत मध्ये स्वयंभू ज्योतिर्लिंग, यजामहे, हे पारब्रह्म परमेश्वर शिव शम्भू, दयामहे। क्षिप्रा तट पे अवन्तिका, उज्जयिनी नगरी, महादेव के मनन में, है मगन सगरी। मां हरसिद्धीपीठ कालिका, विराजे, शिव शिव जापे, आठ पहर चौंसठ घड़ी। याचक शीष निवाते, यक्ष दक्ष करें भस्म आरती शृंगार दर्शन, ऋषि मुनि ध्यानी हर हर हर करें भस्म लेपन, बाजे झांझ मजीरा डमरू, मृदंग तगघड़ान घिडनक तक नकधुम, तिटकत गदीगन धा।। जय श्री महाकाल, जय जय श्री महाकाल...!

या स्तुतीत पारंपरिक वाद्ये आणि राग शिवरंजनीची झलक दिसेल. तरुणांची आवड लक्षात घेता गिटारचाही वापर केला आहे. २५ नाथपंथी लोककलावंतांना निमंत्रण, पुंगीचा आवाज यंत्राने काढला नाही पंतप्रधान मोदी ११ अॉक्टोबरला उज्जैनमध्ये महाकाल लोक कॉरिडॉरचे लोकार्पण करतील

स्तुतिगीत निर्मितीची कथा खेर यांच्याच शब्दांत... गेल्या वर्षी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पणावेळी उज्जैनमध्ये असाच महाकाल लोकचा जीर्णोद्धार होत आहे, हे माझ्या लक्षात आले. त्याच वेळी महाकालला समर्पित एक स्तुतिगीत असावे, असा विचार मनात आला. सहा महिन्यांपूर्वी क्षिप्रा नदीच्या मध्यभागी निर्मित मंचावर ‘कैलाशा लाइव्ह इन कॉन्सर्ट’चे आयोजन केले होते. त्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माझ्यासोबत ‘जय जयकारा’ ही ओळ गायली. तेथेच त्यांनी महाकालवर गीत बनवण्याचे निमंत्रण दिले. मी होकार दिला. स्तुतिगीताचा भाव तर काही क्षणांत मनात आला होता, पण त्याचा इतिहास, पौराणिकता, महिमा, प्रासंगिकता यांसारखे पैलूही गीतात आणणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व माहिती गोळा करण्यासाठी मी तीनदा मुंबईहून उज्जैनला गेलो. त्यानंतर १५ दिवसांत गाणे तयार केले. ‘जय श्री महाकाल’ गाण्यात शिवरंजनी या रागाची झलक दिसेल. प्रथमच भारताच्या एखाद्या संगीत रचनेत पुंगीचा लाइव्ह वापर करण्यात आला आहे. त्यासाठी मेवातहून नाथ संप्रदायाच्या २५ कलावंतांना बोलावले होते. हे कलावंत गारुड्यांप्रमाणे गल्ली-बोळांत फिरून पुंगी वाजवत नाहीत. गाण्यात पुंगी, बगलबच्चा, ऊद, रबाव, शहनाई, डमरू, शंखाच्या आवाजाचाही समावेश आहे. युवकांची आवड लक्षात घेऊन गिटारचाही वापर केला आहे. एकूण ४० वाद्य कलावंत आहेत. ११ ऑक्टोबरला उज्जैनमध्ये माझ्यासोबत २१ सहगायक कोरस म्हणून गातील. शहरात याआधीही दोन-तीन वेळा सादरीकरण केले आहे. माझे बालपण मंदिरातच व्यतीत झाले आहे. महादेवाचाच उपासक आहे, त्यामुळे महादेवाचा प्रभाव माझ्या व्यक्तिमत्त्वावर झाला आहे. जीवनात कटुता, असमानता तर येणारच; पण कर्मठता आणि निष्ठेच्या बळावर पथभ्रष्ट होणार नाही,’ अशी प्रेरणा महादेव आपल्याला देतात.

बातम्या आणखी आहेत...