आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Special Kind Of Space Suit Is Designed For The Astronauts Of 'Gaganyan', It Will Protect Even From The Temperature Of Minus 250 Degrees Celsius.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:‘गगनयान’च्या अंतराळवीरांसाठी तयार केला जातोय विशेष प्रकारचा स्पेस सूट, तो उणे 250 अंश सेल्सियस तापमानापासूनही करेल बचाव

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्रोसोबतच्या करारांतर्गत रशियाची अंतराळ संशोधन संस्था ग्लाव्हकॉसमॉस करतेय सूटची निर्मिती

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना भारताची पहिली मानवी अंतराळ माेहीम ‘गगनयान’ सन २०२२ पर्यंत पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रशियाची राजधानी मॉस्कोत या मोहिमेवर जाणाऱ्या चार अंतराळवीरांसाठी स्पेस सूट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी त्यांची मापे घेण्यात आली आहेत.

हे स्पेस सूट विशेष पद्धतीने तयार केले जातात. कारण ते एखाद्या अंतराळ यानासारखाचे असतात. ते अंतराळातील धाेक्यांपासून संरक्षण करतात. अंतराळ मोहिमेत तापमानात अत्यंत चढ-उतार येत असतात. ते उणे २५० अंशांपर्यंत जाते तर, कधी सूर्याच्या रेषेत असताना २५० अशांच्याही वर असते. सूट निर्मितीसाठी इस्राेने रशियन अंतराळ संस्था ग्लाव्हकॉसमॉससोबत करार केला आहे. सुमारे १० हजार कोटींच्या गगनयान मोहिमेत ग्लाव्हकॉसमॉस स्पेस सूट्सह बॅकपॅकही बनवेल. त्यात आॅक्सिजन व उच्छ्वासातून निघणाऱ्या कार्बन डाइआॅक्साइडला हटवण्याचे उपकरण असेल. बॅकपॅकमधून सूटमध्ये विजेचा पुरवठा होईल. एक फॅनद्वारे सूटमध्ये आॅक्सिजनचे सर्क्युलेशन होईल. यात एक वाॅटर टँकही असेल.

अंतराळवीरांना सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सूटमध्ये गोल्ड लाइन वायसर लावले जातील. अंतराळातील धुळीपासून बचावासाठी ते कवचाप्रमाणे काम करेल. गोळीच्या वेगाने जाणारे हे धूलिकण घातक असतात. सूटचे डिझाइनच असे आहे की त्यात आॅक्सिजन, पाण्याची इन-बिल्ट व्यवस्था असेल.

एखाद्या यानाप्रमाणे स्पेस सूटही अनेक भागांत तयार केला जातो. एक भाग छातीचे संरक्षण करतो, दुसरा बाहूंना कव्हर करत ग्लोव्हजला जोडतो. तिसरा भाग पायांसाठी असतो. या सूटच्या आत अंतराळवीर साधे कपडे घालतात. स्पेस सूट व कापडी वस्त्रांत पाण्याच्या नळ्या असतात. त्यात अंतराळवीराच्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यात मदत करतात.

अंतराळवीरांचे यानात बसण्याचे सीट व कोच लायनर्सचीही निर्मिती

ग्लाव्हकॉसमॉसचे सीईओ दिमित्री लोसकुतोव्हनुसार, यानात बसण्याचे सीट व कोच लायनर्सचीही निर्मिती होत आहे. त्यांनी अँथ्रोपॉमेट्रिक पॅरामीटर्ससाठी सूट तयार होत असलेल्या ज्वेज्दाला भेट दिली. स्पेस सूटसाठी ११ मार्चला करार झाला होता. भारतीय अंतराळवीर मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी फेब्रुवारीपासून मॉस्कोत आहेत. वर्षभराच्या प्रशिक्षणादरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊनही झाले. मात्र प्रशिक्षण थांबले नाही.