आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Stranger Entered In Blind Woman Bank Manager's House Midnight And Tortured Her In Bhopal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोपाळ:दृष्टिहीन महिला बँक मॅनेजरवर घरात शिरून मध्यरात्री अत्याचार, कुटुंबातील सदस्य लॉकडाउनमुळे राजस्थानमध्ये फसले आहेत

भोपाळएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महिलेने सांगितले की, आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन दुष्कृत्य केले

राजधानीच्या शाहपुरा भागामध्ये शुक्रवारी रात्री दृष्टिहीन महिला बँक मॅनेजरचा अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला. आरोपी बाल्कनीतुन घरात शिरला होता. घटनेनंतर मुख्य प्रवेश दवारेवाटे पळून गेला. पीडित महिला आणि तिच्या शेजाऱ्यांचे दरवाजे बाहेरून बंद करून गेला. शनिवारी सकाळी पोलिसांनी दरवाजे उघडले. पीडित महिला घरात एकटी होती. कुटुंबातील सदस्य राजस्थानला गेले होते. लॉकडाउनमुळे भोपाळहून परतू शकले नाहीत.  

एसडीओपी अनिल त्रिपाठी यांनी सांगितल्याप्रमाणे, 53 वर्षांची दृष्टिहीन महिला बँक मॅनेजर आहे. त्या अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांनी सांगितले की, त्यांचे पती 3 मार्चला आपल्या मूळ घरी राजस्थानला गेले होते, जे लाॅकडाउनमुळे परतू शकले नाही. गुरुवारी रात्री उकाड्यामुळे झोप येत नव्हतो, त्यामुळे बाल्कनीचा दरवाजा उघड ठेवला होता. सुमारे चार वाजता अचानक एक व्यक्ती बाल्कनीमधून घरात शिरला आणि त्याने मला जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्यावर जबरदस्ती केली आणि पळून गेला. 

घराचा दरवाजा बंद असल्यामुळे कुणीही मदत करू शकले नाही...  

घटनेनंतर महिलेने जेव्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला कळाले की, त्या अज्ञाताने दरवाजा बाहेरून बंद केला होता. शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले, मात्र त्यांचे दरवाजेदेखील बाहेरून बंद होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी डायल-100 ला फोन केला तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजे उघडले. एसडीओपी त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, महिलेने तीन वर्षांपूर्वी लग्न केले आहे, पतीदेखील दृष्टिहीन आहे. महिला स्वतःच घरातील सर्व कामे करते. सोबतच बँकेतही स्वतःच येणे जाणे करते. आरोपीला शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज शोधत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...