आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Strong Kinship Bond Protects The Child From Deterioration; In This Age Of Technology, Family Is Essential

आज कुटुंब दिन:बळकट नातेसंबंधाची वीण मुलाला बिघडण्यापासून वाचवते; तंत्रज्ञानाच्या अशा काळात कुटुंब आवश्यक

दिव्य मराठी नेटवर्क | दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक माणसाची पहिली शाळा कुटुंबच मानली जाते. कुटुंब हे आपल्यांची सोबत आणि मदतीचे केंद्र असते. आज जागतिक कुटुंब दिनानिमित्त ४ अभ्यासातून जाणून घेऊ कुटुंबाचे महत्त्व आणि यशात त्याचे योगदान... न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, मुलांचा विकास आणि आयुष्यातील वर्तन कुटुंबावर अवलंबून असते. २६ देशांत झालेल्या या अभ्यासात समोर आले की, ज्या कुटुंबात नातेसंबंधाची वीण घट्ट असते,त्या कुटुंबातील मुले नशा आणि बिघडण्यापासून वाचतात. यासोबत अशा मुलांच्या आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. युरोप, आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेत इंटरनॅशनल सर्व्हे ऑफ चिल्ड्रन्स वेल-बीइंगच्या डेटानुसार, चांगल्या कौटुंबीक वातावरणात वाढणाऱ्या मुलांची शाळेत विज्ञानासारख्या विषयातील आवड आणि कामगिरी चांगली राहते. त्यांना यशही मिळते.

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार, वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात नात्यात बदल होणे नैसर्गिक आहे. अशात नवी सांस्कृतिक मानके, प्राधान्यक्रमही बदलला आहे. या काळात जी कुटुुंबे मुलांसोबत पूर्णपणे जोडलेले असतात,त्यांची मुले आधुनिकतेसोबत रितीभाती सोबत घेऊन पुढे जातात. कुटुंबाकडून मिळणारी भावनात्मक मदत वाईट काळातून सहज बाहेर पडण्यात सक्षम बनवते. मजबूत मुळं : भारतात १% घटस्फोट, विदेशात दुपटीवर

भारतीयांसाठी कुटुंब आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सच्या या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतात सर्वात कमी घटस्फोट होतात. भारतात घटस्फोट दर १% आहे. अमेरिकेत तो २.५%, इराणमध्ये १४%, मेक्सिको, इजिप्त आणि द.आफ्रिकेत १७-१७%, ब्राझीलमध्ये २१%, तुर्कीमध्ये २५% आहे. रशियात ७३% आणि युक्रेनमध्ये ७०% आहे. प्यु रिसर्चनुसार, युरोपमध्ये कोरोनानंतर कुटुंबासोबत राहण्याचा ट्रेंड वाढला आहे. वाईट काळात आजी-आजोबा मुलांसाठी उपयुक्त ठरले.