आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूपीएससीत उत्तीर्ण झालेले टॉप-२० प्रज्ञावंत मंगळवारी एकत्र आले होते. पीएमओचे मंत्री जितेंद्रसिंह यांनी त्यांना चहापानासाठी बोलावले होते. भेटीगाठी, गप्पागोष्टी झाल्या. एका सूचनेने टॉपर्सचे लक्ष वेधले. १४ वी रँक मिळवणाऱ्या अभिनव जैन यांच्यासोबत मोठे भाऊ अमन जैनही आले होते. अमन जितेंद्रसिंह यांना म्हणाले, ‘यूपीएससीची तयारी करणे खूप कठीण असते. ज्या उमेदवारांची संधी थोडक्यात हुकते, तेही खूप प्रतिभावंत असतात. ते भलेही आयपीएस-आयएएस अधिकारी होऊ शकत नसले, तरी इतर सेवांसाठी ते पात्र असतात. मग त्या उमेदवारांना इतर सेवांत थेट नियुक्ती देण्याची व्यवस्था का होऊ नये? कारण इतर सेवांच्या परीक्षा यूपीएससीएवढ्या कठीण नसतात.’ त्यावर १७ वी रँक मिळवणाऱ्या महक जैन म्हणाल्या,‘भैया, आपण आता जी सूचना केली ती करण्याची माझीही इच्छा होती, पण मी ती कधीच करू शकले नाही.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.