आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊच्या लेव्हाना हॉटेलला भीषण आग:खिडक्या तोडून 20 जणांची सुखरूप सुटका; 4 ठार, अनेकजण होरपळले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील लेव्हाना हॉटेलला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. त्यात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. हॉटेलमध्ये अद्याप काहीजण अडकलेत. त्यांना हॉटेलच्या खिडक्या तोडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत 20 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पण 15 जण अद्याप आत अडकलेत. 8 जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हॉटेलमध्ये सर्वत्र धूर पसरल्यामुळे अनेकजण बेशुद्ध झालेत. तर काहीजण होरपळल्याचीही माहिती आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाच्या 15 बम्बांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खबरदारी म्हणून घटनास्थळी रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत.

आग लागलेले हॉटेल लखनऊच्या सुप्रसिद्ध हजरतगंजमध्ये आहे. याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. पण घटना सकाळच्यावेळी घडल्यामुळे येथे तेवढी वर्दळ नव्हती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांना मोफत उपचाराचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांना मोफत उपचाराचे आश्वासन दिले.

योगींनी दिले चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी लखनऊ आयुक्त व पोलिस आयुक्तांना या घटनेची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठकही सरकारी रुग्णालयात पोहोचलेत.

लेव्हाना हॉटेलमध्ये आगीमुळे धूर पसरला आहे. यामुळे अनेकजण बेशुद्ध झालेत.
लेव्हाना हॉटेलमध्ये आगीमुळे धूर पसरला आहे. यामुळे अनेकजण बेशुद्ध झालेत.

30 खोल्यांच्या हॉटेलमध्ये 18 जण थांबले होते

लखनऊ डीएम सूर्यपाल गंगवार अपघातानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचले. ते म्हणाले -'हॉटेलमध्ये 30 खोल्या आहेत. अपघातावेळी त्यातील 18 खोल्या पूक होत्या. काहींनी दुर्घटनेपूर्वी हॉटेलही सोडले होते. आमच्याकडे 30 ते 35 जण अडकल्याची माहिती आहे. त्यातील बहुतांश जणांना बाहेर काढण्यात आले आहे. खोली क्रमांक 204 मध्ये अडकलेल्या व्यक्तीशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचाव मोहीम सुरू आहे.'

LIVE अपडेट्स...

  • हॉटेलच्या खिडक्यांना लोखंडी पट्ट्या आहेत. त्या तोडून आत जाण्याचा मार्ग तयार केला जात आहे.
  • जेसीपी कायदा व सुव्यवस्था पीयूष मोराडिया यांच्या मते, खोली क्रमांक 214 मध्ये काहीजण अडकलेत.
धुरामुळे शुद्ध हरपलेल्या लोकांना लगतच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
धुरामुळे शुद्ध हरपलेल्या लोकांना लगतच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
बचाव पथकाने हॉटेलच्या खिडक्या कापून आत अडकलेल्यांना बाहेर काढले.
बचाव पथकाने हॉटेलच्या खिडक्या कापून आत अडकलेल्यांना बाहेर काढले.
बचाव पथक सातत्याने खिडक्यांतून पाण्याचा मारा करत आहे. पण धुरामुळे त्यांनाही समस्येचा सामना करावा लागत आहे.
बचाव पथक सातत्याने खिडक्यांतून पाण्याचा मारा करत आहे. पण धुरामुळे त्यांनाही समस्येचा सामना करावा लागत आहे.
हॉटेल लखनऊच्या सुप्रसिद्ध हजरतगंज भागात आहे. हे वर्दळीचे ठिकाण आहे.
हॉटेल लखनऊच्या सुप्रसिद्ध हजरतगंज भागात आहे. हे वर्दळीचे ठिकाण आहे.

अर्ध्या तासानंतर कर्मचाऱ्यांना आगीची माहिती मिळाली

लेव्हाना हॉटेलमध्ये सकाळी 7.30 च्या सुमारास धुराचे लोट पसरू लागले. हॉटेल कर्मचाऱ्यांना अर्ध्या तासाने म्हणजे 8 च्या सुमारास त्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाला माहिती दिल्यानतंर कर्मचारी मदतीसाठी जमले. हॉटेलच्या आसपासच्या लोकांनी सांगितले की, अनेक जण स्वतः खिडक्या तोडून बाहेर आले. अनेक जण हातात सामान घेऊन बाहेर पडताना दिसत होते.

बातम्या आणखी आहेत...