आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Three year old Russian Boy Has Been Admitted To A Hospital In Chennai With An Artificial Heart

चेन्नई:तीन वर्षीय रशियन मुलास चेन्नईच्या रुग्णालयात बसवले कृत्रिम हृदय, दक्षिण आशियात अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच

चेन्नई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयात पोहचण्यापूर्वी त्याला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले होतेे
Advertisement
Advertisement

तामिळनाडूच्या चेन्नईतील खासगी रुग्णालयात ३ वर्षांच्या रशियन मुलास कृत्रिम हृदय व कृत्रिम पंप बसवण्यात आला आहे. मुलगा आता स्वस्थ आहे. एमजीएम हेल्थ केअरचे संचालक डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी सांगितले, मुलाचे नाव लेव फेडोरेंको आहे. त्याला सर्जिकल बायव्हँट्रिक्यूलर हार्ट इम्प्लांट केलेले आहे. मुलगा रेस्ट्रिक्टिव्ह कार्डियॉमायोपॅथीशी झुंज देतो आहे.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वी त्याला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले होतेे. दक्षिण आशियात अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच करण्यात आली आहे. मुलाचे हृदय रिकव्हर होण्यासाठी रक्ताभिसरण होणे गरजेचे असते. यासाठी त्याला बर्लिन हॉर्ट सपोर्ट करेल. त्याची प्रकृती चांगली आहे.

Advertisement
0