आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Time Capsule To Be Placed 200 Feet Deep In The Sanctum Sanctorum Of The Ram Temple Has Already Been Done By Indira Gandhi And Narendra Modi.

टाइम कॅप्सूल म्हणजे काय?:राम मंदिराच्या गर्भगृहात 200 फूट खोल ठेवले जाणार टाइम कॅप्सूल, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही केले आहे असे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाइम कॅप्सूल ताम्रपत्राची असणार आहे, त्यात मंदिराचा इतिहास, पायाभरणीची तारीख आणि भूमिपूजन करणारे प्रमुख पाहुणे यांचा उल्लेख असेल.
  • 2011 मध्ये मोदींनी महात्मा मंदिराखाली आणि 1973 मध्ये इंदिरा गांधींनी लालकिल्ल्याची पायाभरणी एक टाइम कॅप्सूल ठेवून केली होती

अयोध्येत 5 ऑगस्टला राम मंदिराचा पाया घातला जाईल. यापूर्वी राम मंदिर फाऊंडेशनमध्ये टाईम कॅप्सूल ठेवण्याविषयी बरीच चर्चा आहे. हे कॅप्सूल काय आहे? असे पहिल्यांदाच होत आहे का? असे सर्व प्रश्न लोकांच्या मनात सुरू आहेत. असे सांगितले जात आहे की राम मंदिराचा इतिहास हजारो वर्षांपासून अस्तित्त्वात आहे, यासाठी मंदिराच्या गर्भगृहात 200 फूट खोल अंतरावरील कॅप्सूल ठेवले जाईल.

मंदिराचे संपूर्ण वर्णन आणि इतिहास या टाइम कॅप्सूलवर लिहिला जाईल, जेणेकरून भविष्यात जन्मस्थान आणि राम मंदिराचा इतिहास दिसून येईल आणि कोणताही वाद होणार नाही. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सर्वप्रथम माध्यमांना ही माहिती दिली होती.

बिहारमध्ये राहणारे कामेश्वर चौपाल असे व्यक्ती आहेत, ज्यांनी 9 नोव्हेंबर 1989 मध्ये अयोध्या राम मंदिर निर्माणासाठी आधारशिला ठेवली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णायानंतर राम मंदिर निर्माणासाठी बनवलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये त्यांना सदस्यही बनवले आहे.

1989 मध्येही ताम्रलेख भूमिखाली ठेवण्यात आला होता

राम मंदिराचे मुख्य वास्तुविशारद निखिल सोमपुरा यांचे म्हणणे आहे की पंतप्रधानांच्या कार्यक्रमानंतर मंदिराचे बांधकाम सुरू होईल. त्यांच्या मते 200 मीटर खोलीच्या मातीचा नमुना घेण्यात आला होता, परंतु अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नाही. अहवालाच्या आधारेच, मंदिर बनविणारी कंपनी एलएनटी पाया खोदण्यास सुरवात करेल.

टाईम कॅप्सूल म्हणजे काय?

टाइम कॅप्सूल कंटेनरसारखी असते आणि सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करण्याची क्षमता यामध्ये असते. अयोध्येत राम मंदिराखाली ठेवण्यात आलेला कॅप्सूल काही शतकांनंतर ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून ओळखला जाईल. टाईम कॅप्सूलला ऐतिहासिक महत्त्व असलेले दस्तऐवज म्हणून ओळखले जाते, ज्यात एका काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थितीचा उल्लेख आहे. हे दस्तावेज ताम्रपत्रावर लिहिले जाईल.

टाइम कॅप्सूलवर काय लिहिले जाणार?

या ताम्रपत्रावर मंदिराचा संक्षिप्त इतिहास, शिलान्यासची तारीख, भूमिपूजन करणारे मुख्य अतिथि, उपस्थित विशिष्ट व्यक्तीचे नाव, बांधकाम शैली आणि आर्किटेक्टचे नाव लिहिले जाईल. ट्रस्टचे सभासद कामेश्वर चौपाल यांच्या म्हणण्यानुसार, तांम्रलेख तयार करण्याची जबाबदारी दिल्लीस्थित एका कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

1989 मध्येही राम मंदिराची पायाभरणी झाली होती, तेव्हाही एक ताम्र लेख जमिनीखाली दाबण्यात आला होता

याच काळात ही माहितीही समोर आली आहे की, 1989 मध्ये जेव्हा गर्भगृहासमोर राममंदिराची पायाभरणी झाली होती त्यावेळीही एका ताम्रलेख जमिनीखाली दाबण्यात आला होता. रामलला यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील त्रिलोकीनाथ पांडे यांचे म्हणणे आहे की, तांब्याचा लेख त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक सिंहल यांनी तयार केला होता. पांडे यांनी सांगितले की तांम्रपत्र हा तांब्यापासून बनविला जातो, कारण या धातूला गंज लागत नाही. हा लेख हजारो वर्षे मातीमध्येही सुरक्षित असेल.

जेव्हा इंदिरा गांधींनी टाइम कॅप्सूल बनवले होते

यापूर्वी भारतात अशा महत्त्वाच्या इमारतींच्या पायाभरणीसाठी अशा प्रकारच्या कॅप्सूल ठेवण्यात आलेल्या आहेत. 1973 मध्ये इंदिरा गांधी सरकारने अशीच एक टाईम कॅप्सूल ठेवून लाल किल्ल्याची पायाभरणी केली होती. त्यावेळी याला काल-पत्र असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षाच्या लोकांनी इंदिरा गांधी यांच्या या निर्णयावर बरीच टीका केली होती. या काल-पत्रात इंदिरा गांधींनी आपल्या कुटूंबाचा गौरव केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

इंदिरा सरकारच्या पत्रात काय लिहिले गेले त्याचे रहस्य आजपर्यंत उलगडू शकलेले नाही

इंदिरा गांधी यांच्या सरकारने भूतकाळातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याचे काम भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेकडे सोपवले होते, म्हणजेच आयसीएचआर आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेज इतिहासाचे प्राध्यापक एस. कृष्णसामी यांना संपूर्ण हस्तलिखित तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, परंतु हे काम पूर्ण होण्यापूर्वीच वादात अडकले. इंदिरा सरकारच्या या काल-पत्रात काय लिहिले गेले आहे त्याचे रहस्य आजपर्यंत उलगडू शकलेले नाही.

1977 मध्ये कॉंग्रेसला सत्तेवरून काढून टाकण्यात आले आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्याच्या काही दिवसानंतर, टाइम कॅप्सूल काढून टाकण्यात आले. परंतु जनता पक्षाच्या सरकारने त्या काळातल्या कॅप्सूलमध्ये काय होते? ते उघड केले नाही. नंतर पंतप्रधान कार्यालयाकडून मागविलेल्या माहितीत सांगण्यात आले की पीएमओला त्याबद्दल काहीही माहिती नाही.

मोदींनीही बनवले आहे टाइम कॅप्सूल
टाइम कॅप्सूलच्या वादासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही जोडले गेले आहे. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा 2011 मध्ये त्यांच्यावरही टाइम कॅप्सूल दफण करण्याचा आरोप विरोधीपक्षाने केला होता. विरोधी पक्षाचे म्हणणे होते की, गांधीनगरमध्ये निर्मित महारात्मा मंदिराखाली टाइम कॅप्सूल दफण करण्यात आले आहे. यामध्ये मोदींनी आपली आपली कामगिरी नोंदवली आहे.

2017 मध्ये स्पेनमध्ये 400 वर्षे जूने टाइम कॅप्सूल निघाले होते
30 नोव्हेंबर 2017 मध्ये स्पेनच्या बर्गोसमध्ये जवळपास 400 वर्षे जूने टाइम कॅप्सूल निघाले होते. हे ईसा मसीह यांच्या मूर्तीच्या रुपात होते. मूर्तीमध्ये वर्ष 1777 च्या जवळपास आर्थिक, राजनीतिक आणि सांस्कृतिक माहिती होती.