आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Total Of 761 Candidates Passed The Examination, 150 Candidates Were Kept In Reserve, Subham Kumar Got The First Position

UPSC 2020 चा निकाल जाहीर:एकूण 761 उमेदवारांनी उत्तीर्ण केली परीक्षा, बिहारच्या शुभम कुमारने पटकावला पहिला क्रमांक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 2020 मध्ये झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एकूण 761 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. शुभम कुमार (रोल क्रमांक 1519294) नागरी सेवा परीक्षा, 2020 मध्ये अव्वल आला आहे. त्याने पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्रासह परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शुभमने IIT बॉम्बे मधून B.Tech (Civil Engineering) मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

जागृती अवस्थीने द्वितीय तर अंकिता जैनने तिसरा क्रमांक मिळवला आहे. 2020 च्या नागरी सेवा परीक्षेत 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 545 पुरुष आणि 216 महिलांचा समावेश आहे. जागृती भोपाळच्या मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) मध्ये पदवीधर आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेत भाग घेतला होता ते खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल पाहू शकतात.

https://www.upsc.gov.in/

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. लातूरच्या नितिषा जगताप या विद्यार्थीनीने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात 199 वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तर पूजा कदम या विद्यार्थीनीने अंधत्वावर मात करत युपीएससीत यश मिळवले आहे.

औरंगाबादचा शुभम नागरगोजे ऑल इंडिया रँक ४५३
हा माझा तिसरा अटेम्पट होता. माझे शालेय शिक्षण आणि कॉलेज औरंगाबादमध्येच पूर्ण झाले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. माझे आई बाबा आणि बहिण शासकीय नोकरीत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करतांनाच युपीएससी करायचे ठरवले होते. २०१८ मध्ये मी तयारी सुरु केली. दोन वेळा नाही झाले पण मला माहित होते स्वत:च्या क्षमतेवर विश्वासही होता आपण करु शकतो. तिसऱ्या अटेम्पटमध्ये हे यश मिळाले. अशी प्रतिक्रिया दिव्य मराठीशी बोलताना शुभम नागरगोजे याने दिली.

150 उमेदवारांना ठेवले राखीव

सर्वसाधारण प्रवर्गातून 263, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून 86, इतर मागास प्रवर्गातून 229, अनुसूचित जातीमधून 122, अनुसूचित जमातीतील 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर एकूण 761 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याशिवाय 150 उमेदवारांना राखीव ठेवण्यात आले आहे.

एकूण 836 रिक्त जागा

परीक्षेच्या नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी लक्षात घेऊन, उपलब्ध सेवांच्या संख्येनुसार विविध सेवांमध्ये नियुक्ती केली जाईल. सरकारने भरलेल्या रिक्त पदांची संख्या 180 IAS, 36 IFS, IPS 200, Central Service Group A 302, Group B Service 118 अशा एकूण 836 रिक्त जागा आहेत.

या स्टेपने चेक करा निकाल

1. UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर लॉग इन करा.

2. आता मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या नवीन विभागात जा आणि लेखी निकाल नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 या लिंकवर क्लिक करा.

3. एक नवीन पेज उघडेल. व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) साठी यशस्वी घोषित उमेदवारांची यादी येथे उपलब्ध केली आहे.

4. उमेदवार त्यांच्या रोल नंबरनुसार ते तपासू शकतात. आवश्यक असल्यास, हे पेज डाउनलोड करा आणि हार्ड कॉपी काढा आणि सुरक्षित ठेवा.

बातम्या आणखी आहेत...