आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Two and a half Time Increase In The Family Pension Limit; Raised From Rs 75,000 To Rs 1.25 Lakh

निवृत्ती वेतन:फॅमिली पेन्शन मर्यादेत अडीचपट वाढ; कमाल मर्यादा 75 हजार रुपयांवरून 1.25 लाख रुपये केली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेवेत असताना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जोडीदाराला पेंशन मिळते

सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या फॅमिली पेन्शनची कमाल मर्यादा केंद्राने अडीच पटींपेक्षा जास्त वाढवत कमाल ४५ हजारांवरून १.२५ लाख रुपये केली.

कर्मचाऱ्याचा सेवेत असताना किंवा निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जोडीदाराला फॅमिली पेन्शन मिळते. फॅमिली पेन्शनच्या रकमेच्या कमाल वेतन मर्यादेच्या ५०% व ३०% अशा २ श्रेणी होत्या. सहाव्या वेतन आयोगानुसार आधी ९० हजार रुपये कमाल वेतन मर्यादा होती. या हिशेबाने ५० टक्के पेन्शनच्या श्रेणीत ४५ हजार व ३०% श्रेणीत मासिक २७ हजार रुपये मिळत असत. आता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार कमाल वेतन मर्यादा २.५ लाख रुपये केली आहे. त्यामुळे पेन्शन रक्कम ५०% श्रेणीत १.२५ लाख रुपये व ३०% श्रेणीत ७५ हजार रुपये करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...