आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A UN Expert Of Agriculture Keith Kressman Says India Pakistan Joint Operation Has Stopped Locusts; News And Live Updates

मंडे पॉझिटिव्ह:भारत-पाकिस्तानने संयुक्त मोहिमेत टोळधाडी रोखल्या, आफ्रिकेत असे सहकार्य दिसले तर संकट कायमचे जाईल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संयुक्त राष्ट्रसंघातील कृषिविषयक तज्ज्ञ किथ क्रेसमान यांचे मत

या वर्षी भारतातील पिकांवर टोळधाडीचा धोका नाही. याचे कारण म्हणजे ज्या इराण-पाकिस्तानमार्गे ही टोळधाड येऊन आपली पिके नष्ट करते त्या मार्गावर हे टोळ आता साधे डोकाऊ शकणार नाहीत. भारत-पाकिस्तानच्या संयुक्त प्रयत्नांतून हे सारे शक्य झाले आहे. जगभरातील अशा टोळधाडींवर लक्ष ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न-कृषी संस्थेचे ज्येष्ठ लोकस्ट फोरकास्टिंग ऑफिसर किथ क्रेसमान यांचे हे मत आहे. त्यांच्या मते, गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान या देशांनी ५० कोटींहून अधिक टोळांचे आक्रमण सोसले होते. मात्र, यंदा या वेळी या दोन्ही देशांनी उपाययोजना करून ही टोळधाड रोखली. भारत आणि पाकिस्तानच्या सरकारी विभागांनी एकत्रितपणे हे काम केल्याचे फार कमी लोक जाणतात. यामुळे आज शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.

...तर संकट कायमचे जाईल
या शेतकऱ्यांना आता भरघोस उत्पन्नाची आशा करायला हरकत नाही. कारण, त्यांच्या पिकांना आता टोळधाडीचा धोका नाही. लाेकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन ही भारतीय कृषी मंत्रालयाचा संस्था आहे. अशीच एक संस्था पाकिस्तानात आहे. स्वातंत्र्यापूर्वी या दोन्ही संस्था एकच होत्या. फाळणीनंतरही या दोन्ही संस्था अगदी एकदिलाने काम करत आहेत. याशिवाय, इराण आणि अफगाणिस्तान या देशांच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघाची पथके अशा टोळधाडींवर अभ्यास करतात. याबाबतचा डाटा एकत्र करणे, आपसांत तो शेअर करणे यात महत्त्वाचे असते.

यामुळे कोणत्या भागांत किती टोळ निर्माण होत आहेत याचा अंदाज येऊ शकतो. गेल्या वर्षीपासून भारत-पाक या दोन देशांनी यावर एवढे काम केले की टोळधाडी येऊच शकल्या नाहीत. त्यामुळेच यंदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमध्ये हे टोळ अवतरलेच नाहीत. आता जेवढे टोळ शिल्लक असतील त्यांना निसर्ग संतुलित करेल. या स्थितीत आता भारतात टोळधाडींची शक्यता जवळपास नाहीच. सध्या आफ्रिकेत जर यावर गांभीर्याने उपाययोजना झाल्या तर आगामी काळात जगालाच अशा टोळधाडींपासून मुक्ती मिळेल.

भारत-पाक डाटा शेअरिंगसोबत कारवाईतही अग्रेसर
क्रिथ केसमान सांगतात, हे टोळ साधारणपणे वालुकामय प्रदेशात अंडी देतात. भारतात या टोळांची अडचण ही झाली आहे की, राजस्थानात आता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे. या टोळांना आता जगायचे असेल तर जैसलमेरच्या पश्चिमेकडील भाग किंवा पाकस्तानी सीमेवरील प्रदेशातच जगावे लागेल. नेमक्या या भागात दोन्ही देशांतील संस्था जोमाने कार्य करत आहेत. यात डाटा शेअरिंगसोबत कारवाईचा समावेश आहे.

टोळधाडीत १ दिवसात ३५ लाख लोकांचे अन्न होते फस्त
वाळवंटातील टोळधाडीवर लक्ष ठेवणे तसे कठीण काम आहे. कारण, या टोळांची जीवनसाखळी प्रचंड वेगवान आहे. त्यांची वाढण्याची क्षमताही प्रचंड आहे. मानवी उत्पत्तीच्या पूर्वीपासून ते पृथ्वीवर आहेत. एक दिवसात ३५ लाख लोकांना पुरेल एवढे धान्य हे टोळ एका दिवसात फस्त करतात. हे टोळ मुळापासून नष्ट करणे कठीण आहे. फक्त त्यांच्या टोळ्या होऊ नयेत याकडे लक्ष ठेवणे आपल्या हातात आहे.

बातम्या आणखी आहेत...