आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • A Virtual Meeting Held By Prime Minister Modi, Involving 13 People Including Chief Minister Yogi; Trust Members Are Not Invited

अयोध्याचे विकास मॉडेल:पंतप्रधान मोदींनी घेतली व्हर्च्युअल बैठक, मुख्यमंत्री योगी यांच्यासह 13 जणांचा समावेश; ट्रस्टच्या सदस्यांना आमंत्रण नाही

अयोध्याएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • बैठकीत योजनेला प्रत्यक्षात आणण्याच्या रणनीतीवर चर्चा

अयोध्याच्या विकासासाठी बनवलेल्या व्हिजन डॉक्युमेंट्सबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली असून सुमारे 45 मिनिटे चालली. या बैठकमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह 13 लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीमध्ये ट्रस्टच्या कोणत्याचा संदस्यांना बोलावले नसल्याचे सांगितले जात आहे.

कारण एकीकडे ट्रस्टवर जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन मोठे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीहून तर इतर मंत्री व अधिकारी सीएम योगी यांच्या निवासस्थानावरुन बैठकीत सामील झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून व्हिजन डॉक्युमेंटसचा आढावा घेतला.

बैठकीत योजनेला प्रत्यक्षात आणण्याच्या रणनीतीवर चर्चा
सदरील बैठकीत अर्थसंकल्पानुसार योजना प्रत्यक्षात आणण्याच्या व भविष्यासाठी तयार ठेवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. यासाठी एकट‌्या उत्तर प्रदेश सरकारने 14 कोटींचा आराखडा तयार केला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या अनेक योजनांचाही या व्हिजन डॉक्यूमेंटसमध्ये समावेश आहे. ही योजना केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी अयोध्या चमकवण्याचा सराव सुरू
पुढच्या वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांपूर्वी अयोध्या चमकवण्याची तयारी सुरु आहे. यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने एक मास्टर प्लॅन तयार केला असून केंद्र आणि राज्य सरकारसमवेत जवळपास 20 हजार कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना आजच्या व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अयोध्याच्या विकासकामांबाबत दीपक कुमार प्रधान सचिव गृहनिर्माण यांनी सादरीकरण केले.

बैठकीत या लोकांचा समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या बैठकीला पर्यटनमंत्री नीलकंठ तिवारी, अर्थमंत्री सुरेश खन्ना, नगरविकास मंत्री आशुतोष टंडन उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव आरके तिवारी, अतिरिक्त सचिव गृह व पर्यटन अवनीश अवस्थी, प्रधान सचिव गृहनिर्माण दीपक कुमार, अयोध्या विभागाचे आयुक्त एमपी अग्रवाल, गृहनिर्माण मंडळाचे आयुक्त अजय चौहान, अयोध्याचे जिल्हा अधिकारी अनुज कुमार झा आणि अयोध्या विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डॉ. विशाल सिंग यांचादेखील समावेश होता.

दररोज एक लाख पर्यटक येतील
राम मंदिराचे बांधकाम 2024 पर्यंत पूर्ण केले जाणार असून येथे दररोज एक लाख भाविक-पर्यटक भेट देतील. दरम्यान, येथे येणाऱ्या सर्व एक लाख लोकांना सुविधा देण्याचा विचार या केला जात आहे. हे काम 2024 पूर्ण होईल असे एका सर्वेतून सांगण्यात येत आहे.

व्हिज्युअल डॉक्युमेंटमध्ये या गोष्टींचा समावेश

 • क्रूझ टूरिझम प्रोजेक्ट, रामायण अध्यात्मिक वन आणि सरयू नदीचे आयकॉनिक ब्रिज
 • यामध्ये क्रूझ टूरिझम प्रोजेक्ट, रामकी पाडी रीजनरेशन प्रोजेक्ट, रामायण अध्यात्म वन
 • सरयू नदी आयकॉनिक ब्रिज, आयकॉनिक संरचनेचा विकास, पर्यटन सर्किटचा विकास, ब्रँडिंग अयोध्येचा समावेश आहे.
 • 84 कोसी परिक्रमा अंतर्गत 208 हेरिटेज कॉम्प्लेक्सचे नूतनीकरण, सरयू उत्तर किनार्‍याचा विकास
 • अयोध्याची ब्रांडिंग मोहीम आणि डिजिटल मार्केटिंग, स्मार्ट रोडवरील सार्वजनिक क्षेत्रांचा विकास
 • जलसंचयांच्या सभोवताली मनोरंजन जागेचा विकास सामील आहे
बातम्या आणखी आहेत...