आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A WHO Team Will Travel To China To Investigate The Origin Of The Corona, Accompanied By American Scientists

कोरोनाचा संसर्ग:कोरोना उत्पत्तीच्या चौकशीसाठी डब्ल्यूएचओ पथक चीनला जाणार, अमेरिकी शास्त्रज्ञ असतील सोबत

मुलाखत2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्याशी बातचीत

कोरोनाचा संसर्ग केव्हा संपेल, औषधी किंवा लस केव्हा बाजारात येऊ शकते, विषाणूने पूर्ण जगाला कसे तावडीत घेतले, कोण आहे यासाठी जबाबदार, डब्ल्यूएचओचे पथक चौकशीसाठी चीनमध्ये आतापर्यंत का गेले नाही, डब्ल्यूएचओची कोठे चूक झाली या प्रश्नांची उत्तरे जगभरातील लोकांना हवी आहेत. भास्करचे वरिष्ठ पत्रकार पवनकुमार यांनी डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथ यांच्याशी याबाबत चर्चा केली. वाचा मुख्य अंश...

जग कोरोनाच्या तावडीत कसे सापडले, कोठे चूक झाली हे सांगण्याच्या स्थितीत डब्ल्यूएचओ आहे का?

डब्ल्यूएचओसह बहुतांश देशांना माहीत होते की, या प्रकारचा विषाणू कोणत्याही क्षणी जगाला तावडीत घेऊ शकतो. यासाठी डब्ल्यूएचओसह अनेक संस्था गेल्या १५ ते २० वर्षांपासून सावध करत होत्या, मात्र त्याला गांभीर्याने घेण्यात आले नाही. कोणत्याही देशाने तयारी न केल्याने समस्या वाढली. 

चीनने वेळीच माहिती दिली असती तर स्थिती एवढी भयंकर असती?

चीनने गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला इन्फ्यूएंझासारख्या आजाराबाबत सांगितले, ४ जानेवारीला डब्ल्यूएचओनेही याची माहिती दिली आणि ११ जानेवारीला कोरोनाची पुष्टीही केली. फेब्रुवारीत डब्ल्यूएचओचे पथक १० दिवसांसाठी चीनमध्ये गेले होते. मात्र, केवळ क्लिनिकल आणि अॅपेडेमेलॉजिकल अभ्यास करण्यात आला.

अमेरिकेसह अनेक देश चीनवर आरोप करत आहेत, चौकशी का होत नाही?

असे नाही, आधीही पथक गेले होते आणि शास्त्रज्ञांचे एक पथक लवकरच चीनला जाणार आहे. ते तेथे विषाणूच्या उत्पत्तीबाबत चौकशी करेल. यात अमेरिका, आफ्रिका, रशियासह काही इतर देशांच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. हा विषाणू कसा मानवात आला याचीही चौकशी होईल. आतापर्यंतच्या अभ्यासातून समजले आहे की, हा विषाणू वटवाघळातून मानवात आला आहे.

कोरोना विषाणू किती दिवस लोकांना त्रास देत राहील?

वेगवेगळ्या देशांत २०२१ च्या अखेरपर्यंत हा विषाणू त्रास देऊ शकतो. लस तयार झाली तर काहीसा दिलासा मिळू शकतो. तोंड, नाक झाकून ठेवल्यास संसर्गाचा प्रसार ५०% पर्यंत कमी करू शकतो. फिजिकल डिस्टन्सिंग आणि हाताची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

किती देश कोरोनाचे औषध आणि लस बनवत आहेत?

२५-३० देश लसीवर काम करत आहेत. काही पुढच्या टप्प्यात आहेत, काहींची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. मात्र, लस मानवावर परिणामकारक ठरेल का हे अजून सांगू शकत नाही. त्यावर सतत देखरेख ठेवली जात आहे.

बीसीजी लस व एचसीक्यू हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाला डब्ल्यूएचओ किती प्रभावी मानते? भारतात प्रकरणेही कमी आहेत?

याला अद्याप शास्त्रीय आधार नाही. आशियाई देशांत अद्याप प्रकरणे कमी आहेत, याचे कारण तेथील तयारी असू शकते. आगामी काळ कसा असेल हे सध्या सांगता येणार नाही. थोडीशीही चूक झाली तर स्थिती पूर्णपणे बदलू शकते.

कोरोनाबाबत आता डब्ल्यूएचओला कोणती मोठी चिंता आहे?

लस येत नाही तोपर्यंत आरोग्याबाबत सजग राहावे लागेल. न्यूट्रिशियन, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसाचार आणि मुलांवरील वाढते अत्याचार थांबवणे हे सर्व येत्या काळातील मोठे आव्हान आहे. 

बातम्या आणखी आहेत...