आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Woman Jumps Into The Sabarmati River In Ahmedabad, Saying, 'Dear River, Embrace Me In You'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्येपूर्वी काढला व्हिडिओ:'प्रिय नदी, मला तुझ्यामध्ये सामावून घे' असे म्हणत महिलेने अहमदाबादेतील साबरमती नदीत मारली उडी

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
'प्रिय नदी, मला तुझ्यामध्ये सामावून घे' असे म्हणत महिलेने अहमदाबादेतील साबरमती नदीत मारली उडी
  • पती म्हणाला होता- मरायचे असेल, तर मर

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका विवाहीत महिलेच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने स्वतःचा एक इमोशनल व्हिडिओ बनवला, त्यात तिने आपल्या कुटुंबाप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओत महिला म्हणते की, 'प्रिय नदी, मी प्रार्थना करते की, तु मला तुझ्यात सामावून घेशील.' असे म्हणून महिलेने ब्रिजवरुन नदीत उडी मारली. व्हिडिओ मिळताच कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर फायर ब्रिगेड आणि रेस्क्यू टीमने महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

एकदम शांतीत मरायचयं...

महिला आपल्या व्हिडिओत म्हणते की, ‘हेलो, अस्सलाम अलेकुम, माझे नाव आयशा आरिफ खान...मी आज ते काही करत आहे, ते माझ्या इच्छेने करत आहे. हे कृत्य कुणाच्याही दबावात करत नाहीये. आता काय बोलू, देवाने दिलेले आयुष्य इतकेच होते आणि हे आयुष्य खूप आरामात जगले. डॅड, किती दिवस लढणार? केस विड्रॉल करुन घ्या.'

'आयशा लढाई करण्यासाठी नाही बनली. आरिफवर प्रेम करते, त्याला त्रास देणार नाही. त्याला स्वातंत्र्य हवं असेल, तर आतापासून तो स्वतंत्र आहे. माझे आयुष्य इथपर्यंतच होते. मी खूप आनंदी आहे, आता मी अल्लाहला भेटणार आणि त्यांना विचारणार की, माझ्याकडून काय चूक झाली होती? आई-वडील चांगले मिळाले, मित्र चांगले मिळाले, पण कुठेतरी माझ्यातच दोष होता. अल्लाहला प्रार्थना करते की, पुन्हा माणसांचे तोंड पाहायला मिळू नये.’

आयशा पुढे म्हणाल्या की, ‘एक गोष्ट शिकत आहे, प्रेम करायचे असेल तर दोन्ही बाजूने असावे. एका बाजूने केलेल्या प्रेमात काहीच मिळत नाही. प्रेम लग्नानंतरही मिळत नाही. प्रिय नदी, मला तुझ्यात सामावून घे आणि माझ्या माघारी जास्त गडबड नको होऊ देऊ... थँक्यू, मला आठवणीत ठेवा. अलविदा..’

2018 मध्ये झाले होते लग्न

अहमदाबादमध्ये राहणारे आयशाचे वडील लियाकत अलीने सांगितले की, 'मुलीचे लग्न 2018 मध्ये जालौर (राजस्थान) मध्ये राहणाऱ्या आरिफ खानसोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर पैशासाठी मुलीचा छळ सुर झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतर आरिफने पैशासाठी आयशाला आमच्याकडे सोडले.'

पती म्हणाला होता- मरायचे असेल, तर मर

लियाकत अली म्हणाले की, पैसे दिल्यानंतर आरिफच्या कुटुंबाची लालसा वाढली आणि काही महिन्यानंतर आरिफने आयशाला परत आमच्याकडे सोडले. काही दिवसांपूर्वी आयशाने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, त्यावर आरिफ म्हणाला होता, मरायचे असेल, तर मर. यामुळे आयशा नाराज होती, आणि अखेर तिने आपले आयुष्य संपवले.

बातम्या आणखी आहेत...