आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Woman Wearing Provocative Clothing Does Not Constitute A Crime Of Sexual Harassment

विनयभंगप्रकरणी केरळ सत्र न्यायालयाची टिप्पणी:महिलेने उत्तेजक कपडे घातल्यास लैंगिक शोषणाचा गुन्हा होत नाही

कोझिकोडे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेने उत्तेजक कपडे परिधान केले असल्यास अत्याचारासंबंधी भादंवि कलम 354 - अ नुसार सकृतदर्शनी गुन्हा होऊ शकत नाही,असे मत केरळच्या सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. सामजिक कार्यकर्ते आणि लेखक सिविक चंद्रन (74) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास मंजुरी देताना कोझिकोडेच्या सत्र न्यायालयाने ही टिपण्णी केली आहे. सुनावणीत न्यायालयाने म्हटले, आरोपीने जे फोटो न्यायालयात सादर केले त्यावरून तक्रारदार महिलेची वेशभूषा ही उत्तेजना निर्माण करणारी दिसून येते.

काय आहे प्रकरण
2020 मध्ये एका शिबिरात तरुण लेखिकेचा विनयभंग झाला. लेखिकेच्या तक्रारीनुसार कोयिलांदी पोलिसांनी विनयभंग, लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, ही घटना घडली त्या वेळी महिलेसोबत इतरही अनेक लोक होते.त्यामुळे ही केस खोटी असल्याचा युक्तिवाद चंद्रन यांच्या वकिलांनी केला.

अतिशय चुकीचा संदेश

केरळ महिला आयोग न्यायालयाच्या या मतावर चिंता व्यक्त करताना केरळ महिला आयोगाच्या अध्यक्ष पी.सतीदेवी यांनी न्यायालयाचे हे मत दुर्दैवी असल्याचे सांगितले. या प्रकरणी साक्षीदारांची साक्ष तसेच खटला चालवण्याआधीच न्यायालयाने अशी टिप्पणी करत तक्रारदार महिलेचे आरोप फेटाळले. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत याद्वारे अतिशय चुकीचा संदेश जात आहे.

बातम्या आणखी आहेत...