आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:सुरक्षा दलामध्ये भरती हाेण्यासाठी अग्निवीरांना लेखी परीक्षा सक्तीची; केंद्राने अग्निवीरसंबंधी सवलत आदेश केले स्पष्ट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निवीरांना निमलष्करी दलात १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यांना भरती हाेण्यापूर्वी एक लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. केंद्र सरकारने यासंबंधीची भूमिका पहिल्यांदाच स्पष्ट केली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पाेलिस दलातील (सीआरपीएफ) काॅन्स्टेबल भरतीसाठी गुरुवारी दुरुस्ती नियम जाहीर केले. त्यात अग्निवीरांना शारीरिक दक्षता परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. त्याचबराेबर वयात तीन वर्षांची सूट मिळेल. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला वयात पाच वर्षांची सूट मिळेल. केंद्रीय सशस्त्र दलाचे (सीएपीएफ) अधिकारी म्हणाले, गृह मंत्रालयाकडून याबाबतच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे. जातीआधारित आरक्षणावर काेणताही परिणाम न हाेता अग्निवीरांची भरती कशी केली जाईल, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात ४६ हजार अग्निवीरांची भरती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी सीएपीएफमध्ये सर्व श्रेणींत एकूण रिक्त जागांची संख्या ८४ हजार हाेती, असे सूत्रांनी सांगितले.