आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची आग शुक्रवारी देशभरात भडकलेली असताना ही योजना सैदपूर गावदेखील स्वीकारण्यास तयार नाही. दिल्लीपासून ९० किमी अंतरावरील कारगिल शहीद सुरेंद्रसिंह यांच्या २३ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात त्याचे पडसाद दिसून आले. निवृत्त सैनिकांप्रमाणेच शहीद सैनिकांच्या नातेवाइकांना ही योजना म्हणजे कृषी कायद्यासारखा घाईगडबडीत घेतलेला निर्णय असल्याचे वाटते.
वास्तविक सैदपूर गावाने देशाला १० हजार सैनिक दिले आहेत. परंतु केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधातील हिंसाचारापासून हे गाव दूर आहे. मात्र याविषयीच्या अनेक शंका किंवा प्रश्नांची उत्तरे केंद्राने द्यावीत, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
सैदपूरच्या शहीद स्मारकावर शुक्रवारी दुपारी हवन-यज्ञानंतर पुष्प अर्पण करण्यासाठी गर्दी झाली होती. भरउन्हातही लोकांचा स्नेह जाणवू लागतो. परंतु अग्निपथ योजनेचा विषय निघाल्यावर कार्यक्रमस्थळी वातावरण तापू लागले. त्यातच काही गावकरी शहिदांच्या फलकाकडे इशारा करतात, तर कधी तीन वर्षांपासून सैन्यात स्थायी स्वरूपात भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांकडे पाहू लागतात. माजी सैनिक चरणसिंह विकास नावाच्या तरुणाला आवाज देऊन बोलावतात. लष्कर भरतीची कधीपासून तयार करत आहेस? समोरून उत्तर येते, १७ व्या वर्षापासून.
त्यावर चरणसिंह विचारतात, अग्निवीर व्हायचेय? विकास इतर सहकाऱ्यांकडे पाहत म्हणतो, आम्ही तर कर्मवीर बनणार आहोत. १९७१ च्या युद्धात वीर पुरस्कार मिळवणारे सुभेदार स्वरूपसिंह म्हणाले, अग्निपथ म्हणजे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची थट्टा आहे. सरकार चार वर्षांनंतर २५ टक्के अग्निवीरांना सामावून घेईल. उर्वरित सैनिकांचे काय होणार आहे? त्यांना समाजात अराजक पसरवण्यासाठी सोडले जाणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.