आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Labour | Aadhaar Linked To Account | PM Modi | Money |Aadhaar Enabled Payment Fraud Jharkhand | Jharkhand News

नाहक ताप:मजुराचे आधार महिलेच्या खात्याला लिंक, 1 लाख काढले; अटकेनंतर म्हणाला - मला वाटले PM मोदी पैसे पाठवत आहेत

पश्चिम सिंहभूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
विडी मजूर जीतराय यांनी SP ला लिहिलेल्या पत्रात बँक अधिकाऱ्यांवर आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. - Divya Marathi
विडी मजूर जीतराय यांनी SP ला लिहिलेल्या पत्रात बँक अधिकाऱ्यांवर आपला छळ केल्याचा आरोप केला आहे.

झारखंडमध्ये एका विडी मजुराचा आधार क्रमांक चुकीने एका महिलेच्या बँक खात्याला लिंक झाला. त्यानंतर हा मजुर त्या खात्यातून पैसे काढून अमाप खर्च करत राहिला. तब्बल 2 वर्षांपर्यंत त्याने खात्यातून 1 लाख रुपयांहून अधिकची रक्कम काढली. महिलेला ही गोष्ट समजली तेव्हा तिने बँक मॅनेजरकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला असतागत 24 मार्च रोजी 42 वर्षीय विडी मजूर जीतराय सामंत याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता, तो म्हणाला की, "मला वाटले पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खात्यात पैसे पाठवत आहेत. आता मी पैसे परत करू शकत नाही. माझी तेवढी कुवत नाही."

मजूर जीतराय सामंत यांना वाटले की, त्यांना पंतप्रधान मोदी त्यांच्या खात्यात पैसे टाकत आहेत.
मजूर जीतराय सामंत यांना वाटले की, त्यांना पंतप्रधान मोदी त्यांच्या खात्यात पैसे टाकत आहेत.

कॉमन सर्व्हिस सेंटरवर समजले आधार दुसऱ्या अकाउंटला लिंक झाले

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी बेजराबदारपणे जीतराय सामंत यांचे आधार दुसऱ्या एका महिलेच्या खात्याला लिंक केले. जीतराय कॉमन सर्व्हिस सेंटरवर गेला असता त्याचे आधार पैसे असणाऱ्या दुसऱ्याच कुणाच्या तरी खात्याला जोडण्यात आल्याचे समजले. त्या खात्यातून सामंत सातत्याने पैसे काढत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, एक बँक कर्मचारीही या मजुराला पैसे काढण्यास मदत करत होता.

ज्या महिलेच्या अकाउंटला सामंतचे आधार लिंक झाले होते, तिचे नाव लागुरी आहे. त्यांना आपल्या खात्यातून हळूहळू पैसे गायब होत असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी झारखंड राज्य ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली.

व्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले व चुकीचा शोध घेऊन सामंत यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले. सामंत पैसे देण्यास सक्षम नव्हता. त्यामुळे गत ऑक्टोबर महिन्यात त्याच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला.

मजुराने 2 डिसेंबर 2022 रोजी प्रकरण रद्दबातल करण्यासाठी SP कडे अर्ज् केला.
मजुराने 2 डिसेंबर 2022 रोजी प्रकरण रद्दबातल करण्यासाठी SP कडे अर्ज् केला.

बँक अधिकाऱ्यावर विडी मजुराचा छळ केल्याचा आरोप

विडी कामगार जीतराय यांनी बँकेचे अधिकारी आपला मानसिक छळ करत असल्याची तक्रार एसपींकडे केली होती. त्यात तो म्हणाला की, गत सप्टेंबर महिन्यात बँकेने माझे आधार चुकीच्या खात्याशी लिंक केल्याची माहिती दिली. तसेच मला 1 लाख रुपये परत करावे लागतील असेही सांगितले. सामंत यांनी आपल्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. ज्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे चुकीचे आधार लिंकिंग झाले, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही केली.