आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पक्षानेे (आप) राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीला अंतिम रूप दिले आहे. सोमवारी या अभियानाचा प्रारंभ आप राजस्थानमधून करणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जयपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मंगळवारी दोन्ही नेते मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सभेद्वारे राजद्यातील वातावरणाचा अंदाज घेतील. आपचे सर्वाधिक लक्ष राजस्थानवर आहे. पंजाबलगतच्या भागांकडे आप ‘साॅफ्ट टार्गेट’ म्हणून पाहत आहे.
पंजाबचा प्रभाव असलेल्या भागातून जागा मिळतील असा विश्वास पक्षाला आहे. आपच्या कोअर टीमला राजस्थानात तीन चित्र दिसले आहेत. पहिले- अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या संघर्षात काँग्रेसला किती नुकसान होईल आणि निवडणुकीवेळी गेहलोत यांची भूमिका काय असेल. दुसरे- भाजप वसुंधराराजेंना स्वातंत्र्य देणार की नाही. मात्र आपला वाटत आहे की सालासारमध्ये वसुंधराराजे यांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर त्यांचा दावा मजबूत झाला आहे. वसुंधरा मजबूत झाल्या तर काँग्रेसचे नुकसान होईल, असे आपला वाटते. अशा स्थितीत होणाऱ्या काँग्रेसच्या नुकसानीचा फायदा उचलण्याची संधी दिसत आहे. आपने काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही फीडबॅक घेतला आहेे. काँग्रेसच्या अतर्गत संघर्षामुळे अधिकारीही त्रस्त असल्याचे त्यातून कळले आहे. मंत्री गेहलोत गटाचा, आमदार पायलट गटाचा आणि खासदार भाजपचा, अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे. तिसरे- स्वत:च्या बळावर कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊ शकतील, अशा नेत्यांच्या शोधात आप आहे. राजस्थानात बसपच्या तिकिटावर अनेकदा आमदार निवडून आले आहेत. त्यांनी सारकार स्थापनेतही महत्वाची भूमिका बजावली आहे.
पक्षाचा संघर्ष सुरूच राहील
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत व्याप्ती वाढवणार, असा संदेश आपला गुजरात निवडणुकीत निराशाजनक कामगिरी आणि दिल्लीत मनीष सिसोदिया यांना अलीकडेच झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना द्यायचा आहे. आप काँग्रेसची मते खाते, असा समज आहे. त्याचाही पक्षाला फायदा उचलायचा आहे.
भगवंत मान यांच्या माध्यमातून पंजाबींना आपलेसे करणार
आप भगवंत मान यांना सेलिब्रिटी चेहरा मानते. मात्र, आता शीख आणि पंजाबींमध्येही त्यांचे वलय मजबूत करू इच्छिते. मान जेथे जातील तेथील पंजाबी जनतेसमवेत स्वतंत्रपणे संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीपर्यंत मान यांच्या रूपात एक मोठा चेहरा समोर यावा, असे आपचे धोरण आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी अनेकदा शीख समुदायांशी संवाद साधून त्यांच्याप्रति जवळीकता दाखवली.
छत्तीसगड : ‘फ्री’ फॉर्म्युल्याद्वारे आदिवासींवर नजर
छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या मनात उतरण्यासाठी ‘आप’ फ्री फॉर्म्युल्याचा वापर करेल. यासाठी दिल्ली, पंजाबात दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधांचा पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भाजपवरही आपची नजर आहे. राजस्थानप्रमाणे येथेही माजी सीएम डॉ. रमण सिंह यांच्याबाबतचे भाजपचे धोरण त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.