आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आता उत्तर प्रदेशात प्रवेश करणार आहे. आप 2022 मध्ये यूपीच्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसेच केजरीवाल यांनी योगी सरकारवर विकासाच्या शर्यतीत उत्तर प्रदेशला मागे टाकल्याचा आरोप केला.
केजरीवाल म्हणाले की, "यूपीच्या लोकांना तिथे सुविधा मिळत नसल्याने ते दिल्लीत येत आहेत. जर दिल्लीत सुविधा तयार करता येतील तर यूपीमध्ये हे का होऊ शकत नाही. यूपीने आतापर्यंत फक्त गलिच्छ राजकारण पाहिले आहे. अशा परिस्थितीत त्याला आता नवीन संधी मिळायला हवी."
दिल्लीप्रमाणेच यूपीमधील जनतेला सुद्धा सुविधांचा हक्क
भारतातील सर्वात मोठे राज्य सर्वात मोठे विकसनशील राज्य होऊ शकत नाही का? संगम विहारमध्ये मोहल्ला क्लिनिक सुरू होऊ शकते तर लखनऊच्या गोमतीनगरमध्ये का सुरू होऊ शकत नाही. खासगी शाळांच्या धर्तीवर यूपीमध्ये सार्वजनिक शाळांना मोफत पाणी आणि वीज का मिळू शकत नाही? असे अनेक प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत. दिल्लीत यूपीचे बरेच लोक राहतात, त्यांनाही यूपीमध्ये दिल्लीसारख्या सुविधा मिळाव्यात असे आमचे आवाहन आहे.
उत्तर प्रदेशातील जनता आम आदमी पक्षाच्या पाठीशी
केजरीवाल म्हणाले की, ''उत्तर प्रदेशातील जनता जुन्या राजकारणाने त्रस्त आहे आणि आता जनता आम आदमी पक्षाच्या पाठीशी उभे आहे. आम आदमी पक्षाने तिसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन केले आणि काम करून दाखवले. दिल्लीतील लोकांना मोफत वीज, पाणी मिळत आहे. ते मोहल्ला क्लिनिकमधून उपचार घेत आहेत, तर गोरखपूर, लखनऊ आणि उत्तर प्रदेशातील इतर शहरांमध्ये हे का होऊ शकत नाही.''
आपच्या UP प्रभारीवर 11 गुन्हे दाखल
आम आदमी पक्षाचे यूपी प्रभारी संजय सिंह ऑगस्टपासून उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, कोरोना तपासणी व उपचारांमध्ये दुर्लक्ष अशी प्रकरणे उपस्थित करून ते योगी सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. संजय सिंह यांच्यावर आतापर्यंत 11 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.