आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष विस्तार:कर्नाटकामध्ये विस्ताराचे आम आदमी पार्टीचे प्रयत्न

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पार्टीने देशपातळीवर विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून कर्नाटकमध्येही आपने पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बृहत् बंगळुरू महानगरपालिका निवडणुकीत आप उमेदवार उभे करणार आहे. ही निवडणूक याच वर्षी हाेण्याची शक्यता आहे, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राव यांनी सांगितले. बंगळुरूतील २४३ वाॅर्डांमध्ये किमान १० हजारांवर सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. राज्य पातळीवर पक्षाने ग्राम संपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. त्याद्वारे संघटनेचा विस्तार करण्याची पक्षाची याेजना आहे. पक्षामध्ये दहा प्रकारचे विभाग आहेत. महिला, तरुण, ओबीसी-एससी-एसडी, ट्रेडर्स, शेतकरी, व्यावसायिक असे विभाग आहेत. पक्षाचे कर्नाटक निवडणूक प्रभारी दिलीप पांडे याच आठवड्यात बंगळुरूचा दाैरा करतील. वास्तविक आपला कर्नाटकमध्ये विस्ताराच्या दृष्टीने अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...