आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aanchal, Shivangi, Apoorva And Pooja Complete A Surveillance Mission In The North Arabian Sea On Their Own.

महिला नौसैनिकांनी रचला इतिहास:आंचल, शिवांगी, अपूर्वा आणि पूजा यांनी स्वबळावर उत्तर अरबी समुद्रातील निगराणी मिशन केले पूर्ण

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच स्वबळावर उत्तर अरबी समुद्रातील निगराणी मिशन पूर्ण करून इतिहास रचला आहे. आयएनएएस ३१४ फ्रंटलाइन नेव्हल एअर स्क्वाड्रनच्या पाच महिला अधिकाऱ्यांनी ते पूर्णत्वास नेले. मिशनसाठी डोर्नियर विमानाचा वापर केला.

विमानाच्या चालकदलाचे नेतृत्व लेफ्टनंट आंचल शर्मा यांनी केले. टीममध्ये लेफ्ट. शिवांगी, अपूर्वा गीते, पूजा पांडा आणि सब लेफ्ट. पूजा शेखावत होत्या.

बातम्या आणखी आहेत...