आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायब राज्यपालांच्या विराेधात रात्रभर धरणे:नायब राज्यपालांनी 1400 कोटींच्या जुन्या नोटा बदलल्याचा आपचा आरोप

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

िदल्लीत आम आदमी पार्टी व भाजप यांच्यातील दरी वाढत चालली आहे. त्यातच आम आदमी पार्टीने नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्यावर गंभीर आराेप करून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी आप आमदारांनी रात्रभर विधानसभा परिसरात धरणे धरले. आपचे प्रवक्ते साैरभ भारद्वाज म्हणाले, नाेटबंदीदरम्यान विद्यमान उपराज्यपालांनी खादी ग्रामाेद्याेग आयाेगाच्या अध्यक्षपदावर असताना १४०० काेटी रुपयांचा घाेटाळा केला. या प्रकरणाची चाैकशी केली जावी, अशी मागणी आपच्या आमदारांनी केली आहे. आराेप असल्यास चाैकशी करावी, असे त्यांनी स्वत:च म्हटले हाेते. त्यामुळे आता आम्ही त्यांची सीबीआय, ईडीद्वारे चौकशीची मागणी करत असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. आता आपचे शिष्टमंडळ नायब राज्यपालांच्या विराेधात सीबीआयकडे तक्रार देऊ शकते. आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी सक्सेना यांच्यावर खादी ग्रामाेद्याेगच्या अध्यक्षपदावर असताना नाेटबंदीदरम्यान १४०० काेटी रुपयांच्या घाेटाळ्याचा आराेप केला हाेता. त्यासाठी पाठक यांनी खादी ग्रामाेद्याेगाच्या दाेन माजी कर्मचाऱ्यांच्या जबाबाचादेखील हवाला दिला. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविराेधात तक्रार केल्यानंतरही काही कारवाई झाली नाही. त्यांच्या आदेशानुसार खादीतील जुन्या नाेटांची अदलाबदली करून नवीन नाेटा वापरण्यात आल्या. काळ्या पैशांना व्हाइट करण्यात आले.

सीबीआयकडून ४५ मिनिटे लाॅकरची झडती नवीन मद्य धाेरणावरून टीकेचे लक्ष्य झालेले उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया यांच्याविराेधात सीबीआयने आणखी एक कारवाई केली. तपास संस्थेने मंगळवारी त्यांच्या बँक लाॅकरची ४५ मिनिटे झडती घेतली. त्या वेळी मनीष सिसाेदिया व त्यांच्या पत्नीदेखील हजर हाेत्या. त्यानंतर सिसाेदिया यांनी विधानसभेच्या अधिवेशनात भाजपवर टीका केली. भाजप ‘बच्चा चाेर पार्टी’ असल्याचा आराेप त्यांनी केला. सीबीआयला माझ्या घरी पाठवण्यात आले. परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यातच सभागृहात भाजप सदस्य आक्रमक झाले हाेते. ते अध्यक्षांच्या वेलमध्ये दाखल झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...