आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • AAP Gujrat CM Candidate Updates, Gujrat Assembly Elections, Arvind Kejriwal's Press Conference Latest News

गुजरात निवडणूक:इसुदान गढवी असतील आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल शुक्रवारी पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. राज्यातील जनतेने पक्षाला दिलेल्या कौलाच्या आधारे या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आल्याचे, ते म्हणाले.

कोण आहेत इसुदान गढवी?

10 जानेवारी 1982 रोजी गुजरातमधील पिपलिया येथे जन्मलेले इसुदान गढवी हे व्यवसायाने पत्रकारही आहेत. इसुदान गढवी यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत 14 जून 2021 रोजी पक्षात प्रवेश केला. गुजरातमधील 'आप'चे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांनी गतवर्षीच आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.
आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांनी गतवर्षीच आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.

इशुदान गढवी हे सध्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरातमधील 16 लाख 48 हजार 500 लोकांनी आपले मत दिले आहे. गुजरातमधील 16 लाखांहून अधिक लोकांच्या मताच्या आधारे त्यांनी निर्णय घेतला आहे. येथील जनतेने इशुदान गढवी यांची निवड केली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेच असतील. गुजरात बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. 'आप' हे नवे इंजिन, नवी आशा आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत इसुदान गढवी यांच्याशिवाय इतर काही नावेही चर्चेत होती. त्यापैकी एक गोपाल इटालियाचे नाव होते. गोपाल इटालिया हे गुजरातमधील आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा आहेत. ते पाटीदार समाजातून येतात. 2017 मध्ये ते पाटीदार आंदोलनातील सर्वात प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. मात्र, ते अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले.

याशिवाय अल्पेश कथेरिया यांनी गेल्या महिन्यात केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. तेही पाटीदार समाजातून येतात. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडेही पाहिले जात होते.

कोण-कोण होते शर्यतीत

पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, आपच्या राज्य युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया, राष्ट्रीय सरचिटणीस इसुदान गढवी आणि सरचिटणीस मनोज सोरठिया हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पक्षाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले होते की, केजरीवाल शुक्रवारी अहमदाबादमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानुसार आज त्यांनी पत्रकार परिषद घेत इसुदान गढवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

गेल्या आठवड्यात, केजरीवाल यांनी लोकांना एसएमएस, व्हॉट्सअप, व्हॉईस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधून राज्यात पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा यावर त्यांचे मत मांडण्याचे आवाहन केले होते. सध्या गुजरातेत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे.

केजरीवाल म्हणाले होते की, 'पंजाब निवडणुकीदरम्यान आम्ही लोकांना विचारले होते की पुढचा मुख्यमंत्री कोण असावा. जनतेच्या पसंतीप्रमाणे मान यांना सीएम केले.
केजरीवाल म्हणाले होते की, 'पंजाब निवडणुकीदरम्यान आम्ही लोकांना विचारले होते की पुढचा मुख्यमंत्री कोण असावा. जनतेच्या पसंतीप्रमाणे मान यांना सीएम केले.

जनतेकडून मागवली होती पसंती

3 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत लोकांना आपले मत कळवण्याची मुदत देण्यात आली होती. त्यांच्या मतांच्या आधारे पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव दुसऱ्या दिवशी जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले होते.

त्यावेळी केजरीवाल म्हणाले होते की, 'पंजाब निवडणुकीदरम्यान आम्ही लोकांना विचारले होते की पुढचा मुख्यमंत्री कोण असावा. जनतेने भगवंत मान यांचे नाव प्रचंड बहुमताने घेतले होते आणि जनतेच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले.

आपचे आतापर्यंत 118 उमेदवार

AAP ने गुरुवारी गुजरात निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची नववी यादी जाहीर केली आणि आतापर्यंत घोषित उमेदवारांची संख्या 118 वर नेली. दरम्यान, 182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी पुढील महिन्यात 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...