आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Election Result; Aap Party In Gujarat | Arvind Kejriwal | Bhupat Bhayani

गुजरातमध्ये पक्षांतराचा खेळ सुरू:AAP च्या एका आमदारासह 3 अपक्ष देणार भाजपला पाठिंबा, निवडणुकीपूर्वी सोडली होती पार्टी

जुनागड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुनागड जिल्ह्याच्या विसावदर मतदार संघातील AAPचे आमदार भूपत गांडुभाई भयाणी.

गुजरातमधील भाजपच्या विक्रमी विजयानंतर आता पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. आम आदमी पार्टीच्या 1 व 3 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी भाजपत जाण्यास साफ नकार दिला आहे. या 4 पैकी 3 आमदार यापूर्वी भाजपतच होते.

AAP आमदार भूपत भयाणी प्रथमच जुनागड जिल्ह्यातील वसावदार मतदार संघातून विधानसभेवर पोहोचलेत. ते यापूर्वीही भाजपत होते. निवडणुकीला काही महिन्यांचा अवकाश असताना ते आपमध्ये गेले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपत प्रवेश करण्याचे वृत्त फेटाळले. त्यांनी आपशी गद्दारी करणार नसल्याचा दावा केला आहे.

भूपत भयाणी.
भूपत भयाणी.

दुसरीकडे, बायडचे आमदार धवल झाला, धानेराचे मावजी देसाई व वाघोडियाच्या धर्मेंद्र वाघेला 3 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. झाला व मावजी देसाई यांनी भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी केली होती. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व विजयी झाले.

भूपेंद्र पटेलांचा सोमवारी शपथविधी, पीएमही येणार

भूपेंद्र पटेल सोमवारी शपथ घेतील. त्यांच्या नेतृत्वात भाजपने विक्रमी विजय संपादन केला आहे.
भूपेंद्र पटेल सोमवारी शपथ घेतील. त्यांच्या नेतृत्वात भाजपने विक्रमी विजय संपादन केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत विक्रमी 156 जागा जिंकल्यानंतर भूपेंद्र पटेल सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला हजर राहणार आहेत.

भाजप 156, काँग्रेस 17, आपने जिंकल्या 5 जागा

गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपने विक्रमी 156 जागा जिंकल्या. 2017 च्या तुलनेत यंदा त्याला 58 जागा जास्त मिळाल्या. दुसरीकडे, काँग्रेसचे सर्वाधिक 60 जागांचे नुकसान झाले. पक्षाने गतवेळी 77 जागा जिंकल्या होत्या. यंदा त्याला 17ग जागांवरच समाधान मानावे लागले. आम आदमी पार्टीनेही 5 जागा जिंकल्या. तर अपक्षांना 3 व सपला 1 जागा मिळाली.

आपचा 5 जागांवर विजय

गुजरात विधानसभा निवडणूक 2 टप्प्यांत झाली. पहिल्या टप्प्याचे मतदान 1 व दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी झाले. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. त्यात भाजपला सर्वाधिक 156 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 17 व आपला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले.

विसावदरमध्ये भूपत भयाणी यांचे मोठे वर्चस्व आहे.
विसावदरमध्ये भूपत भयाणी यांचे मोठे वर्चस्व आहे.

भूपत भाजपचे माजी नेते

आपच्या तिकिटावरह विसावदर विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर पोहोचलेले भूपत भयाणी या क्षेत्रातील भाजपचे माजी नेते होते. त्यांचा या भागात मोठा प्रभाव होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते आपमध्ये गेले होते. या जागेवर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्षद रिबाडिया यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने करशन वडोदरिया यांना तिकीट दिले होते. भूपतचा थेट सामना हर्षद रिबाडिया यांच्याशी होता. त्यात भूपत यांचा 6904 मतांनी पराभव केला. भूपत यांना 65675, तर हर्षद यांना 58771 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या करशनभाई यांना अवघी 16781 मते मिळाली.

विसावदरवर भाजपचे वर्चस्व

विसावदर विधानसभा मतदार संघावर गत अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व होते. ही जागा 1995, 1998, 2002 व 2007 मध्ये भाजपच्या ताब्यात होती. पण 2012 च्या निवडणुकीत येथे जीपीपीचा उमदेवार निवडून आला. त्यानंतर 2017 च्या निवडणउकीत काँग्रेस नेते हर्षदकुमार रिबाडिया यांनी भाजपच्या किरीट बालुभाई पटेल यांचा पराभव केला. निवडणुकीपूर्वी हर्षदने भाजपत प्रवेश केला. पण त्यांचा आपच्या भूपत यांच्याकडून पराभव झाला.

निवडणुकीनंतर भूपत म्हणाले होते - मला आमदार करणाऱ्या पक्षाला मी मी स्वप्नातही धोका देणार नाही.
निवडणुकीनंतर भूपत म्हणाले होते - मला आमदार करणाऱ्या पक्षाला मी मी स्वप्नातही धोका देणार नाही.

प्रथम म्हणाले - पक्षाला धोका देणार नाही

निवडणुकीतील विजयानंतर पत्रकारांनी भूपत यांना भाजपत जाण्याचा प्रश्न केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते - मला आमदार करणाऱ्या पक्षाला धोका देण्याचा मी स्वप्नातही विचार करणार नाही. कारण, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.

विसावदरचा चर्चित चेहरा आहेत भूपत

भाजप कार्यकर्ते म्हणून भूपत भयाणी यांनी भेसन व विसावदरचे सरपंच म्हणूनही काम पाहिले आहे. ते नेहमीच जनतेत मिसळतात. सामूहिक लग्न सोहळे व शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी ते ओळखले जातात. कोरोना काळातही त्यांनी गावात कोविड सेंटर उघडले होते. त्यानंतर ते विसावदारचे चर्चित चेहरा बनले.

जाणून घ्या AAPच्या इतर 4 उमदेवारांची माहिती...

अहिर हेमंतभाई हरदासभाई

जामजोधपूर विधानसभा मतदारसंघातून अहिर हेमंतभाई हरदासभाई यांनी भाजपचे चिमणभाई सप्रिया यांचा पराभव केला. अहिर हेमंतभाई हरदासभाई यांना 71397 मते मिळाली, तर चिमणभाई सपरिया यांना 60994 मतांवर समाधान मानावे लागले.

मकवाना उमेशभाई नारणभाई

बोताड विधानसभा मतदारसंघातून आपचे मकवाना उमेशभाई नारनभाई यांनी भाजपचे घनश्यामभाई प्रागजीभाई विराणी यांचा पराभव केला. मकवाना उमेशभाई नारनभाई यांना 80581 तर घनश्यामभाई प्रागजीभाई विराणी यांना 77802 मते मिळाली.

सुधीरभाई वाघाणी

आम आदमी पार्टीचे उमेदवार सुधीरभाई वाघाणी यांनी गरियाधर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नकाराणी केशुभाई हिरजीभाई यांचा पराभव केला आहे. सुधीरभाई वाघानी यांना 60944, तर केशुभाई हिरजीभाई यांना 56125 मते मिळाली.

चैतरभाई दामजीभाई वसावा

देडियापाडा विधानसभा मतदारसंघातून आपचे चैतराभाई दामजीभाई वसावा यांनी काँग्रेसच्या जरमाबेन शुक्लाल वसावा यांचा पराभव केला. चैतराभाई दामजीभाई वसावा यांना 103433, तर जरमाबेन शुक्लाल यांना 12587 मते मिळाली आहेत. भाजपचे हितेशकुमार देवजीभाई वसावा यांच्या खात्यात 63151 मते गेली.

बातम्या आणखी आहेत...